दिल्लीनंतर आता ‘या’ राज्यातून 1 लाख लोक बेपत्ता! कुठेही ठावठिकाणा नाही, पोलीस यंत्रणेत उदासीनता
कशी आली माहिती समोर?
पीडितेने हातवारे करून पोटात विचित्र वेदना होता असल्याचे तिच्या आजीला सांगितलं होत. त्यानंतर, कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णलयात नेलं आणि मेडिकल टेस्टनंतर डॉक्टरांनी पीडित ५ महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. ही धक्कादायक बाब समजताच रुग्णालयाच्या प्रशासनाने तात्काळ कफ परेड पोलिसांना याची माहिती दिली.
वडिलांनी काय सांगितलं?
पीडिता तिच्या अपंगत्वामुळे स्पष्ट जबाब देण्याच्या स्थितीत नव्हती. दरम्यान, तिच्या वडिलांनी सांगितलं की त्यांची मुलगी लहानपणापासूनच मानसिकदृष्ट्या अपंग आहे आणि तिच्यासोबत कोणत्याही प्रकरचा लैंगिक अत्याचार झाला नाही. तसेच, त्यांचं कुटुंब सुद्धा याबाबत कोणतीही तक्रार दाखल करणार नसल्याचं देखील ते म्हणाले. मात्र, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरूच ठेवला आणि पीडितेच्या काउन्सलिंगमध्ये तिने अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी संमती दिली.
कसा केला तपास
पोलिसांनी सुरुवातीला अज्ञात आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहिता (BNS) च्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला. त्यामध्ये मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या अपंग तरुणीचं लैंगिक शोषण तसेच, जबाब देण्यास असमर्थ असलेल्या मुलीवर बलात्कार यासंबंधी कलमांचा समावेश होता. पोलिसांच्या माहितीनुसार, 21 मार्च ते 21 सप्टेंबर 2025 दरम्यान ही घटना घडली आणि 22 सप्टेंबर 2025 रोजी या प्रकरणाचा एफआयआर दाखल करण्यात आला.
पोलिसांनी संशयितांच्या ओळखीच्या आधारे 17 हून अधिक लोकांचे रक्ताचे नमुने घेतले. त्यानंतर ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले. गर्भाचं सॅम्पल देखील डीएनए चाचणीसाठी पाठवण्यात आलं. 27 जानेवारी 2026 रोजी, फॉरेन्सिक लॅबच्या अहवालात संबंधित गर्भाचा डीएनए पीडितेच्या वडिलांशी मॅच झाला. डीएनए रिपोर्ट्सच्या आधारे, पोलिसांनी मुलीच्या वडिलांची चौकशी केली त्यांनतर मुलीच्या वडिलांना अटक केली. या प्रकरणाचा तपास करत आहे.
Latur Crime: लातूरमध्ये धक्कादायक प्रकार! दोन वर्षे आई-बहिणीला खोलीत कैद; पोलिसांकडून सुटका
Ans: दक्षिण मुंबईतील कफ परेड परिसरात.
Ans: तरुणीला पोटदुखी झाल्यानंतर तपासणीमध्ये ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले.
Ans: डीएनए अहवालानंतर आरोपी वडिलांना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.






