Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rajan Salvi Shinde Group Entry : अखेर राजन साळवी यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश; ठाण्यात पार पडला पक्षप्रवेश

शिवसेनेचे एकनिष्ठ नेते म्हणून ओळखले जाणारे राजन साळवी यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. राजन साळवी हे मागील अनेक दिवसांपासून नाराज होते.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 13, 2025 | 05:08 PM
राजन साळवी यांचा शिवसेना (एकनाथ शिंदे) गटात पक्षप्रवेश

राजन साळवी यांचा शिवसेना (एकनाथ शिंदे) गटात पक्षप्रवेश

Follow Us
Follow Us:

ठाणे : शिवसेनेचे एकनिष्ठ नेते म्हणून ओळखले जाणारे राजन साळवी यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. राजन साळवी हे मागील अनेक दिवसांपासून नाराज होते. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर अखेर आज राजन साळवी यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साक्षीने राजन साळवी यांनी धनुष्यबाण हाती घेतले आहे.

मागील अनेक दिवसांपासून राजन साळवी हे शिवसेना ठाकरे गटामध्ये नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यांच्या नाराजीची राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा झाली. मात्र आता राजन साळवी हे शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये राजन साळवी यांचा पक्षप्रवेश होणार आहे. विरोधकांनी तपास यंत्रणाच्या चौकशीचा ससेमीरा मागे लागल्यामुळे राजन साळवी शिंदे गटामध्ये जाणार असल्याची टीका केली होती. मात्र आता राजन साळवी यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

राजन साळवी यांनी पक्षप्रवेशापूर्वी पत्रकार परिषद घेत शिवबंधन तोडण्याचे कारण देखील सांगितले आहे. राजन साळवी म्हणाले की, “नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूक २०२४ चा पराभव माझ्या जिव्हारी लागला आहे. या निवडणुकीत माझ्या पक्षातीलच नेत्यांनी माझ्या विरुद्ध काम केलं. विनायक राऊत हेच माझ्या प्रभावाला कारणीभूत असून, त्यांच्यामुळे मी पक्ष सोडत आहे. विनायक राऊत यांनी माझ्याविरोधात काम केलं. याबाबत मी उद्धव ठाकरे यांना पुरावे दिले आहेत. मी बाळासाहेबांचा लाडका शिवसैनिक आहे. त्यांना अभिप्रेत असलेले काम मी आजपर्यंत केले आणि त्यांच्याच विचारांचे काम मी पुढे नेणार आहे,” असे मत राजन साळवी यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

कोण आहेत राजन साळवी?

राजन साळवी  हे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून राजकीय वर्तुळामध्ये ओळखले जातात. ते राजापूर विधानसभेचे तीन वेळा आमदार राहिले आहेत. भारतीय विद्यार्थी सेनेपासून त्यांनी त्यांच्या राजकीय कारकि‍र्दीला सुरुवात केली. 1993 ते 94 च्या सुमारास ते शिवसेनेत सक्रीय झाले. त्यांनी पहिल्यांदा शिवसेनेचे नगराध्यक्षपद भूषवलं होतं. राजन साळवींनी रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाप्रमुखपदही सांभाळलेले आहे.  2009 च्या निवडणुकीमध्ये ते पहिल्यांदा राजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. मात्र आत्ताच्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत उदय सामंतांचे बंधू किरण सामंतांकडून राजन साळवींचा पराभव झाला. त्यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता. विधानसभा निवडणुकीत विनायक राऊतांनी मदत न केल्याचा आरोप राजन साळवींनी केला आहे. अवैध मालमत्ताप्रकरणी एसबीकडून राजन साळवींच्या घरी छापेमारी करण्यात आली होती.

 

Web Title: Rajan salvi join shivsena eknath shinde leves uddhav thackeray

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2025 | 04:41 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Rajan Salvi
  • shivsena

संबंधित बातम्या

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन
1

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन

उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंना कोर्टाचा दिलासा; Vasant Davkhare मानहानी प्रकरणाचा निकाल, 2009 च्या CD प्रकरणात चौघांची निर्दोष मुक्तता
2

उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंना कोर्टाचा दिलासा; Vasant Davkhare मानहानी प्रकरणाचा निकाल, 2009 च्या CD प्रकरणात चौघांची निर्दोष मुक्तता

Drought Inspection: दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री मैदानात! फडणवीस मराठवाड्यात तर शिंदे विदर्भात
3

Drought Inspection: दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री मैदानात! फडणवीस मराठवाड्यात तर शिंदे विदर्भात

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून शिंदे गटाचा आज युक्तिवाद; अंतिम निर्णय आता नेमकी कधी?
4

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून शिंदे गटाचा आज युक्तिवाद; अंतिम निर्णय आता नेमकी कधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.