दैनंदिन आहारात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. सतत तिखट आणि तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय घातक ठरते. रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर हार्ट अटॅक किंवा हृदयविकाराचा झटका येण्याची जास्त शक्यता असते. अशावेळी भोपळ्याच्या बियांचे सेवन करावे. भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. या बियांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर इत्यादी अनेक घटक आढळून येतात. चला तर जाणून घेऊया भोपळ्याच्या बियांचे फायदे. (फोटो सौजन्य – istock)
शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी नियमित करा भोपळ्याच्या बियांचे सेवन
भोपळ्याच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर आढळून येते. फायबर आतड्यांमधील पचन प्रक्रिया मंदावून कोलेस्टेरॉलचे शोषण कमी करते. शरीरातील अतिरिक्त कोलेस्टेरॉल बाहेर काढून टाकण्यासाठी भोपळ्याच्या बियांचे सेवन करावे.
शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी भोपळ्याच्या बियांचे नियमित सेवन करावे. हृदयाच्या आरोग्यासाठी भोपळ्याच्या बिया गुणकारी ठरतात.
भोपळ्याच्या बियांमध्ये नैसर्गिकरित्या फायटोस्टेरॉल संयुगे असतात. ही संयुगे शरीरातील कोलेस्टेरॉलच्या कमी करतात आणि आतड्यांमध्ये कोलेस्टेरॉलचे शोषण रोखतात.
भोपळ्याच्या बिया ट्रिप्टोफॅन अमीनो ऍसिड मोठ्या प्रमाणावर आढळून येते. या बियांच्या सेवनामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते. याशिवाय मूड सुधारण्यासाठी भोपळ्याच्या बिया दह्यात मिक्स करून खाव्यात.
शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आहारात वेगवेगळ्या बियांचे सेवन करावे. यामध्ये असलेले झिंक शरीरासाठी प्रभावी ठरते.