प्रतिकात्मक फोटो
अकोला (Akola). दिवसाढवळ्या अश्लील चाळे करणाऱ्या एका प्रेमीयुगुलाच्या लीलांना कंटाळलेल्या स्थानिक रहिवाशांनी त्यांना बेदम चोप दिल्याची घटना सोमवारी जुने शहरातील गोडबोले उद्यानजवळ (Godbole Udyan) घडली. यावेळी या युगुलास डाबकी रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले (The couple was handed over to Dabki Road police) . मागील काही दिवसांपासून जुने शहरातील प्रेमीयुगुल व चिडीमारांसाठी गोडबोले उद्यान व परिसर आवडीचे ठिकाण (favorite place for lovers) झाले आहे.
[read_also content=”कुकर्माचा अंत/ अल्पवयीन सावत्र मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न; लाकडी दांड्याने वार करून बापालाच संपविले https://www.navarashtra.com/latest-news/attempted-rape-of-a-minor-stepdaughter-he-killed-his-father-with-a-wooden-stick-nrat-130682.html”]
या भागात दिवसा परिसर आवडीचे ठिकाण झाले आहे. या भागात दिवसा सामसूम होत असल्याचे पाहून काही प्रेमीयुगुलांच्या अश्लील चाळ्यांना ऊत येत असल्याने स्थानिक रहिवासी कमालीचे वैतागले आहेत.अज्ञाच एका प्रेमीयुगुलास स्थानिक रहिवाशांनी चांगलाच चोप दिल्याचा प्रकार गोडबोले उद्यान भागात घडला. या प्रकाराची डाबकी रोड पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठत प्रेमीजोड्यास ताब्यात घेतले. यातील प्रेमवीर काळा मारोती परिसरातील रहिवासी आहे.
पालकांनो मुलांना सांभाळा !
कोरोनाच्या काळात महाविद्यालये तसेच खासगी शिकवणी वर्गही बंद आहेत. अज्ञावेळी दुपारी, सायंकाळी आपली मुले,मुली घराबाहेर कशासाठी जातात, कोणत्या कामाची सबब सांगतात. हे तपासण्याची जबाबदारी पालकांची आहे मुलांचे फाजील लाड बंद करून त्यांना जमिनीवर आणण्यासाठी पालकांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे.
दुपारी पोलिसांची गस्त हवी
गोडबोले उद्यान परिसरात गर्द हिरवे वृक्ष आहेत या झाडांखाली,उद्यानाच्या भिंतीचा आडोसा घेऊन प्रेमीयुगुल तासन् तास गप्पात रंगतात.ही बाब ध्यानात घेता या परिसरात दुपारी डाबकी रोड पोलिसांनी नियमित गस्त घालण्याची मागणी समोर आली आहे.