Rohit Sharma’s Powerful Batting : काल भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मॅचमध्ये रोहितची बॅट बोलत होती अन् ऑस्ट्रेलियाचे गोलंदाजांकडे दात चावण्याशिवाय काही पर्याय दिसत नव्हता. अनेक दिवसांपासून फॉर्म हरवलेल्या या महान खेळाडूने दाखवून दिले तो का महान आहे. अनेक जण म्हणत होते रोहितचे वय झालेय, त्याचा फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत होते. त्याचा फॉर्म हरवलाय. लेफ्टी बॉलर त्याची शिकार करतात, वगैरे वगैरे अनेक टीका झाल्या. विशेषतः मिचेल स्टार्क त्याची कायम विकेट घेतो. पण, कालच्या सामन्यात रोहितने सगळ्यांची तोंड बंद केली.
रोहितची अजरामर खेळी
A fine display with the bat 🏏
Rohit Sharma is the @Aramco POTM award 🙌#AUSvIND #T20WorldCup pic.twitter.com/4X5GK6zwpf
— ICC (@ICC) June 24, 2024
रोहित शर्माने कालचे मैदान गाजवले
डोळ्यांची पारणे फेडणारी बॅटींग रोहितने केली. मुंबईच्या पोराने कालचे मैदान गाजवले. स्वतःच्या 100 धावांची पर्वा न करता नुसता कांगारूंच्या गोलंदाजांना धुत होता. मिचेल स्टार्कच्या 1 ओव्हरमध्ये त्याने 29 धावा कुटल्या. भारतीय संघाने प्रथम फलंदाजीला सुरूवता केली. विराट लवकर गेला पण कर्णधार रोहित शर्माने आपले नेतृत्व सिद्ध केले. मिचेल स्टार्कलाच फाईन लेग, मिड अॉन, कव्हरला मारलेला सिक्सर डोळ्याचे पारणे फेडणारा होता. त्याने मारलेला प्रत्येक शॉट जबरदस्त होता. फाईन लेगला मारलेला सिक्सर तर कमालीचा होता.
पॅट कमिन्सलासुद्धा सोडले नाही
पॅट कमिन्सला स्वीप मारलेला लेग साईडला मारलेला सिक्सर कमालीचा होता. तो मैदानाच्या बाहेर गेला अखेर नवीन चेंडू घ्यावा लागला. एक्स्ट्रा कव्हरला मारलेला स्टायनिसला मारलेला सिक्सर प्रेक्षकांमध्ये उत्साह भरणारा होता. मैदानाच्या प्रत्येक ठिकाणी रोहितने शॉट मारला. कर्णधार रोहित शर्माने मैदानाच्या 360 डिग्री फटकेबाजी केली. ऑस्ट्रेलियाचा एकही गोलंदाज काल रोहित समोर टिकू शकला नाही.
वा शर्माजी! छा गये
Talk about leading from the front 🫡
Captain Rohit Sharma put on a stunning show with the bat to set up #TeamIndia's win & bagged the Player of the Match award 👏 👏#T20WorldCup | #AUSvIND | @ImRo45 pic.twitter.com/gCo66HWeVa
— BCCI (@BCCI) June 24, 2024
अवघ्या 41 चेंडूत 92 धावांची खेळी
कालचा दिवस टीम इंडियासाठी कमाली होता. कर्णधार रोहित शर्माने जबरदस्त बॅटींग करीत मैदानाच्या 360 डीग्री शॉट मारत कांगारूंची धुलाई केली. ऑस्ट्रेलियाचा एकही गोलंदाज रोहितसमोर टिकला नाही. अवघ्या 41 धावांत 92 धावांची खेळी अजरामर राहिली यातून मागच्या विश्वकपचा बदला तर घेतलाच आणि त्याच्यावर टीका करणाऱ्यांची तोंडच बंद करून टाकली.