गेल्या कित्येक दिवसांपासून सईच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु होती. लग्नाच्या प्रत्येक सोहळ्याचे फोटो सई सोशल मीडियावर शेअर करत होती. अखेर अभिनेत्री सई लोकूर आता विवाहबंधनात अडकली(sai lokur got married) आहे. सईने तिर्थदीप रॉयसोबत लग्न केले आहे.
सई आणि तिर्थदीप यांनी आज सकाळी मराठमोळ्या पद्धतीने लग्न केले. २९ नोव्हेंबर रोजी सई-तिर्थदीप यांच्या लग्नाचं देवकार्य पार पडलं होतं. त्याचेदेखील फोटो सईने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. सई व तीर्थदीप यांचा साखरपुडा २ ऑक्टोबर २०२०२ रोजी पार पडला होता. त्यावेळी सईने तिर्थदीपसाठी एक खास पोस्ट शेअर केली होती.
सई आणि तिर्थदीप यांची ओळख एका मॅट्रीमोनिअल वेबसाईटवरुन झाली होती. सईने याविषयी एका मुलाखतीत सांगितले होते की, “गेल्या दोन वर्षांपासून मी मॅट्रीमोनिअल वेबसाइटवर माझ्या ‘मिस्टर परफेक्ट’ला शोधत होती. तिथेच माझी आणि तिर्थदीपची ओळख झाली. ऑगस्टपासून आम्ही बोलू लागलो. काही दिवसांतच आम्हाला एकमेकांचा स्वभाव आवडू लागला. तो आईला घेऊन बेळगावला मला भेटायला आला. त्या भेटीतच आमचं लग्न ठरलं. ”
[read_also content=”#RajinikanthPoliticalEntry : थलैवा रजनीकांतची राजकारणात एन्ट्री?आज करणार मोठी घोषणा https://www.navarashtra.com/india-news-marathi/rajinikanthpoliticalentry-thalaiva-rajinikanths-entry-into-politics-58096/”]