"रशियन विद्यार्थ्यांची हिंदीकडे ओढ! पुतिनच्या मंत्र्यांनी भारताचा उल्लेख करून हिंदी शिकण्याचे महत्त्व का सांगितले?"( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Russia Hindi education push : भारतातील सांस्कृतिक शक्ती केवळ योग, आयुर्वेद किंवा बॉलिवूडपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर आता जगभरात हिंदी भाषेची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. युरोपपासून अमेरिकेपर्यंत आज हिंदी शिकणाऱ्यांची संख्या वाढत असून, आता या यादीत रशियाचा ठळक उल्लेख करावा लागेल. अलीकडेच रशियाचे उच्च शिक्षण उपमंत्री कॉन्स्टँटिन मोगिलेव्हस्की यांनी दिलेल्या विधानाने चर्चेला नवे वळण दिले आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “आमच्या अधिकाधिक विद्यार्थ्यांनी हिंदी शिकावी अशी आमची इच्छा आहे.” हे वक्तव्य त्यांनी भारताचा उल्लेख करताना केले.
भारत आणि रशियामधील संबंध ऐतिहासिकदृष्ट्या नेहमीच घट्ट राहिले आहेत. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अनेक वेळा हे अधोरेखित केले आहे की, “मॉस्को हा नवी दिल्लीचा सर्वात विश्वासू मित्र आहे.” दुसऱ्या महायुद्धानंतर भारत-रशिया संबंध जगातील सर्वात मजबूत आणि स्थिर संबंधांपैकी एक म्हणून पाहिले जातात. आजही संरक्षण, ऊर्जा, अवकाश, विज्ञान, शिक्षण अशा अनेक क्षेत्रांमध्ये हे सहकार्य जोमाने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर रशियाकडून हिंदी शिकण्याला दिलेले प्रोत्साहन ही केवळ भाषेची बाब नाही, तर ती दोन्ही देशांतील सांस्कृतिक सेतू मानली जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पापुआ न्यू गिनीच्या 50 व्या स्वातंत्र्यदिनी भारतीय नौदलासाठी अभिमानास्पद क्षण; ‘INS Kadmatt’ ने केले फ्लीट रिव्ह्यूचे नेतृत्व
रशियन वृत्तसंस्था TASS ला दिलेल्या मुलाखतीत मोगिलेव्हस्की यांनी हिंदी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या अधोरेखित केली. त्यांनी सांगितले की भारतासारख्या विशाल देशात लोक इंग्रजीपेक्षा हिंदीचा वापर जास्त करतात, त्यामुळे रशियन विद्यार्थ्यांनी या भाषेकडे लक्ष दिले पाहिजे. आज हिंदी शिकू इच्छिणाऱ्या तरुणांना केवळ भाषिकच नव्हे तर शैक्षणिक आणि सांस्कृतिक संधीही उपलब्ध होत आहेत. पूर्वी काही मोजकेच विद्यार्थी या क्षेत्रात यायचे; परंतु आता हिंदी शिकणाऱ्यांचे गट दोन ते तीनपट वाढले आहेत.
Namaste, 🇷🇺! Hindi Hits The Books In Russian Unis As Student Embrace Language
Opportunities to study the language at university level will be massively expanded, according to Deputy Minister Konstantin Mogilevsky.
“We want more of our students to study Hindi. India is the… pic.twitter.com/jEcxFvKjD4
— RT_India (@RT_India_news) September 6, 2025
credit : social media
मॉस्कोमधील प्रतिष्ठित MGIMO, RSUH, मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ एशियन अँड आफ्रिकन स्टडीज आणि मॉस्को स्टेट लिंग्विस्टिक युनिव्हर्सिटी या सर्व ठिकाणी हिंदी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. येथे प्रवेश घेणाऱ्यांची संख्या सतत वाढत आहे. फक्त मॉस्कोच नव्हे तर सेंट पीटर्सबर्ग स्टेट युनिव्हर्सिटी आणि कझान फेडरल युनिव्हर्सिटीमध्येही हिंदी शिकवली जात आहे. या वर्गांमध्ये आता विद्यार्थ्यांची नोंदणी लक्षणीयरीत्या वाढली आहे. यावरून हे स्पष्ट होते की, हिंदी केवळ भारतापुरती मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय शैक्षणिक पातळीवर स्थिरावते आहे.
याच दरम्यान, आणखी एक महत्त्वाची घटना म्हणजे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन डिसेंबरमध्ये भारताच्या अधिकृत भेटीवर येणार आहेत. या भेटीमुळे दोन्ही देशांमधील सहकार्य आणखी दृढ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी ऑगस्टमध्ये म्हटले होते की, “भारत आणि रशियामधील संबंध हे जगातील सर्वात मजबूत संबंधांपैकी एक आहेत.” पुतिन यांच्या या भेटीमुळे हिंदी भाषेवरील चर्चेला आणि शैक्षणिक सहकार्याला नवे बळ मिळेल, अशी शक्यता आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : VIRAL Post : 2 मिनिटांत 8 वेळा Thank You… व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्पसमोर घाबरूनच का होते Appleचे CEO टिम कुक?
हिंदी ही आता केवळ भारतीयांची भाषा राहिलेली नाही. ती आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण करत आहे. रशियन विद्यार्थ्यांची हिंदीकडे वाढती ओढ ही भारताच्या सांस्कृतिक शक्तीची आणि जागतिक प्रभावाची जिवंत साक्ष आहे. पुतिन यांच्या भारत भेटीच्या पार्श्वभूमीवर रशियन विद्यार्थ्यांचे हिंदीकडे वळणे हे भारत-रशिया नात्याचे नवे पर्व ठरेल, यात शंका नाही.