चीनचा पाकिस्तानला दगा? अब्जावधींच्या प्रकल्पात गुंतवणूक करण्यापासून घेतली माघार (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Pakistan China Relations : बीजिंग/इस्लामाबाद : चीन आणि पाकिस्तान (Pakistan) संबंधामध्ये वेगळे वळण आले आहे. पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या चीनने (China) एका मोठ्या प्रकल्पातून माघार घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चीनने पाकिस्तानसोबतच्या चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (CPEC) प्रकल्पातून माघार घेतली आहे. हा प्रकल्प गेल्या काही वर्षात अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता. पंरुत आता मात्र चीनने यामध्ये गुंतवणूक करण्यास नकार दिला आहे.
या प्रकल्पाची सुरुवात २०१५ मध्ये करण्यात आली होती. सुरुवातील चीनने CPEC प्रकल्पामध्ये ६० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले होते. या प्रकल्पांतर्गत दोन्ही देशांत उर्जा, महामार्ग, बंदरे आणि ML-1 रेल्वे अपग्रेड अशा कार्यांचा समावेश होता. याअंतर्गत कराचीपासून ते पेशावरपर्यंत १,८०० लाबींचा रेल्वे मार्ग तयार केला जाणार होता. हा प्रकल्प पाकिस्तानसाठी अत्यंत महत्वाचा मानला जात होता.
न्यूजर्सीत नगरपरिषदेच्या बैठकीत कर वाढीला अनोखा निषेध; उमेदवाराने केला ‘ब्रेक डान्स’, Video Viral
पण गेल्या दहा वर्षात या प्रकल्पासाठी अनेक चर्चा होऊनही निधी उभारला गेला नाही. यामुळे चीनने या प्रकल्पातून माघार घेतली असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे पाकिस्तान सरकरा यासाठी आशियान डेव्हलपमेंट बॅंक (ADB) कडे वळले आहे. यापूर्वी देखील या संस्थेचा आधार पाकिस्तानने घेतला होता. ही एक वित्तीय संस्था आहे. अडचणीच्या काळात देशांना आर्थिक मदत करते.
चीनच्या या निर्णयाचा पाकिस्तानला आर्थिकच नव्हे तर भू-राजकीय धक्काही बसला आहे. यामुळे पाकिस्तान आणि चीनच्या मैत्रीच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. अगदी भारतविरोधी युद्धातही चीनने पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. पण आता चीनच्या या निर्णयातून दिसून येते की, मैत्री आपल्या जागी आणि पैसा आपल्या जागी आहे. चीन कोणतीही आर्थिक जोखमी स्वीकारणार नाही. यामुळे CPEC प्रकल्पाची गती अधिक मंदावली आहे.
ॲस्ट्रोनॉमर कंपनीच्या EX-HR पतीला देणार घटस्फोट; न्यू हॅम्पशायर न्यायालयात याचिका दाखल