गोंदिया : राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप वातावरण निर्मितीसाठी शालेय शिक्षण विभागातर्फे ‘सखी सावित्री समिती’ स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती शाळा, केंद्र आणि तालुका-शहरस्तरावर असणार आहे. शाळेतील विद्यार्थ्यांची १०० टक्के पटनोंदणी आणि उपस्थितीबाबत आग्रही असणे. तसेच, विद्यार्थ्यांच्या भावनिक शारीरिक व बौद्धिक विकासासाठी या समित्या कार्यरत असणार आहेत. विशेष म्हणजे, प्रत्येक पातळ्यांवर पालकांचे समुपदेशन करण्यावर समितीद्वारे भर देण्यात येणार आहे.
[read_also content=”४८ तास लोटूनही महिलेचे शव अजूनही गवसले नाही, बोटीच्या सहाय्याने शोध मोहीम अद्यापही सुरूच https://www.navarashtra.com/chandrapur/vidarbha/chandrapur/womans-body-still-unaccounted-for-48-hours-later-boat-search-continues-nraa-256183.html”]
सद्यः स्थितीत मुलींचे शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षिततेबाबत प्राधान्याने लक्ष केंद्रित करण्याची गरज जाणवत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुला-मुलींच्या शिक्षणावर दूरगामी परिणाम झालेले आहेत. पालकांच्या स्थलांतरामुळे शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढण्याची भीती आहे. तसेच बालविवाहांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे, अशा परिस्थितीत घर, शाळा आणि समाजात विद्यार्थ्यांची सुरक्षा व बालस्नेही वातावरण मिळवे, म्हणून वेगवेगळ्या पातळ्यांवर ‘सखी सावित्री समिती’ स्थापन करण्यात येणार आहे.
[read_also content=”हुल्लडबाजांची दुचाकीवर ‘स्टंटगिरी’ अपघातात वाढ तर, कारवाई शुन्य https://www.navarashtra.com/latest-news/vidarbha/gondia/if-rioters-increase-the-number-of-stuntgiri-accidents-on-two-wheelers-then-there-is-no-action-nraa-256209.html”]
विद्यार्थ्यांचे सामाजिक, भावनिक, अध्ययन उत्तमरीत्या व्हावे, यासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १२५ व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विविध स्तरावर समित्या स्थापन करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव इम्तियाज काझी यांनी दिले आहेत. प्रत्येक केंद्रस्तर समितीने कार्याचा अहवाल तालुका स्तर समितीच्या प्रत्येक तीन महिन्याच्या बैठकीत सादर करावा लागणार आहे. दरम्यान, शिक्षण विभागाच्या या निर्णयाचा पालक वर्गातून स्वागत करण्यात येत आहे.
[read_also content=”कारागृहाच्या अधीक्षकांना न्यायालयाने सुनावला सात दिवसांचा कारावास आणि दंडाची शिक्षा https://www.navarashtra.com/nagpur/vidarbha/nagpur/the-jail-superintendent-was-sentenced-by-the-court-to-seven-days-imprisonment-and-fine-nraa-256154.html”]
ही असेल जबाबदारी
कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये विद्यार्थ्याची १०० टक्के उपस्थिती साध्य करणे, त्यासाठी पटनोंदणी करणे, विद्यार्थी, पालकांचे समुपदेशन करणे, करिअरसंबंधी मार्गदर्शन, शासकीय योजनांची माहिती देणे, बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती करणे, कौशल्य विकास होण्यासाठी विविध उपक्रम राबविणे, शैक्षणिक नुकसान कमी करण्यासाठी उपाययोजना करणे अशी असणार आहे.
शाळास्तरावरील समिती
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांचाही समितीत समावेश असणार आहे. तर शाळेतील महिला शिक्षक, समुपदेशक, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ (महिला), अंगणवाडी सेविका, पोलिस पाटील, ग्रामपंचायत सदस्य (महिला), पालक (महिला), शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी यांचा समोवश राहणार असून सदस्य सचिव हे शाळेचे मुख्याध्यापक असणार आहेत.