Russia Ukraine War : युक्रेनच्या झेलेन्स्कींनी नाकारली पुतिन यांची मॉस्कोत चर्चेची ऑफर; म्हणाले, 'मी दहशतवाद्यांच्या...' (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Zelensky Rejects Putin’s Moscow Offer : एक मोठी बातमी समोर आली आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymir Zelensky) यांनी पुतिन यांच्या मॉस्कोतील चर्चच्या ऑफरला नकार दिला आहे. गेल्या आठवड्यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांनी झेलेन्स्की यांना मॉस्कोमध्ये थेट शांतता चर्चेची ऑफर दिली होती. पण झेलेन्स्की यांनी याला नकार देत मी दहशतवाद्यांच्या राजधानीत जाणार नाही असे म्हटले आहे.
पुतिन यांना कीवमध्ये भेटीची ऑफर
त्यांच्या या विधानाने मोठे खळबळ उडाली आहे. पुन्हा एका तीन वर्षाहून अधिक काळ सुरु असलेल्या युद्ध थांबवण्याच्या शांतता प्रयत्नांवर पाणी फेरले आहे. याऐवजी झेलेनस्की यांनी पुतिन यांनी युक्रेनची राजधानी कीवमध्ये बोलावले आहे. त्यांनी म्हटले आहे की, पुतिन यांच्या त्यांच्याशी शांतता चर्चा करायची असेल तर त्यांनी कीवमध्ये यावे.
डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि पुतिन यांची भेट झाल्यानंतर सध्या दोन्ही देशांवर शांतता चर्चेचा दबाव निर्माण केला जात आहे. यामुळे रशियाने मॉस्कोमध्ये चर्चेची ऑफर दिली होती.
गेल्या काही काळापासून रशिया सातत्याने युक्रेनवर हल्ला करत आहे. परंतु या काळात पुतिन यांनी पुढाकार घेत शांतता चर्चेसाठी तयारी दर्शवली होती. त्यांनी झेलेन्स्की यांनी रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये चर्चेसाठी आमंत्रण दिले होते. पॅरिमधील परिषदेदरम्यान झेलेन्स्कींना हे आमंत्रण मिळाले होते. झेलेन्स्की यांनी याची पुष्टीही केली होती.
यावर झेलेन्स्की यांनी उत्तर दिले असून याला नकार दिला आहे. दरम्यान क्रेमलिनच्या प्रवक्त्याने सांगितले आहे की, झेलेन्स्कींना मॉस्कोत आमंत्रित करण्यात आले होते, शरणागती पत्करण्यासाठी नव्हे, पण त्यांना यासाठी नकार दिला आहे.
याच वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाउसमध्ये प्रतिनिधींसोबतच्या बैठकीदरम्यान युद्ध थांबवण्यात अपयशी ठरल्याचे कबुल केले आहे. त्यांनी म्हटले होते की, मला वाटले हे युद्ध थांबवणे सर्वात सोपे असेल, परंतु असे नाही. पुतिन यांच्याशी चांगले संबंध असून देखील मी मदत करु शकलो नाही असे त्यांनी म्हटले आहे.
रशियाचा युक्रेनवर हल्ला
या सर्व राजकीय घडामोडींदरम्यान रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरुच आहेत. नुकतेच रविवारी (०७ सप्टेंबर) पहाटे रशियाने युक्रेनच्या राजधानी कीववर हल्ला केला आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर १० जण जखमी झाले आहेत. याच वेळी गेल्या पाच दिवसांत रशियाने १,३०० हून अधिक ड्रोन आणि ५०० क्षेपणास्त्रे डागल्याचाही दावा युक्रेनने केला आहे.
ॲस्ट्रोनॉमर कंपनीच्या EX-HR पतीला देणार घटस्फोट; न्यू हॅम्पशायर न्यायालयात याचिका दाखल