मुंबई : ‘ पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) ज्या कामाच्या उद्घाटनासाठी येत आहे. ते स्वागतार्ह आहे, एका अर्थाने ते आमच्याच कामावर शिक्कमोर्तब करत आहे याचा आनंद आहे. मात्र, बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्र अनावरण कार्यक्रमाला त्यांचे चिरंजिव आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांना सन्मानाने बोलावलं जात नाही. उद्धव ठाकरे म्हणायचे, बाप पळवणारी टोळी आली आहे. त्यामध्ये तथ्य आहे’, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे सरकारवर टीका केली.
[read_also content=”‘अजित डोभाल लांनी बंडखोरांना घरी जेवणासाठी आमंत्रित केलं तेव्हा त्यांच्या पत्नीने डुकराचे मांस बनवलं होतंं’, मुलाखतीत धक्कादायक बाब उघड https://www.navarashtra.com/india/when-ajit-doval-invited-mizo-national-front-rebels-for-dinner-at-his-home-nrps-362588.html”]
उद्धव ठाकरे यांना न बोलवण्यावरु सध्या ठाकरे गटामधलं वातावरण तापलं आहे. या प्रकारावरुन त्यांनी देवेंद्र फडणवीसांवरही टिका केली. देवेंद्र फडणवीस बदला घेता की नाही हे मी सांगू शकत नाही. पण राज्यात सूड आणि बदला घेण्याचे राजकारण सुरू आहे’ असं संजय राऊत यांनी म्हण्टलं.
युवासेनेनं जे विषय उचलला आहे, त्याबद्दल सरकार उत्तर देतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या कामाच्या उद्घाटनासाठी मुंबईमध्ये येणार आहे, त्या कामाचे मुंबई महापालिका आणि मविआने केली आहे. शिवसेनेनं सुरू केलेल्या कामाची पायाभरणी करण्यासाठी मोदी इथं येत आहे, एका प्रकारे आमच्या कामावर शिक्कामोर्तब होत आहे. याचा आनंद आहे, असंही राऊत म्हणाले.
विधानभवनात उद्या हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या तैलचित्राचा अनावरण 23 जानेवारीला म्हणजे बाळासाहेबांच्या जन्मदिनी (Birth Annivesary) होणार आहे. या सोहळ्याची निमंत्रण पत्रिका नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. हा शासकीय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता प्रसाद ओक (Actro prasasd oak) करणार आहे. मात्र, या निमंत्रण पत्रिकेत बाळासाहेबांचे पुत्र आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख नाही. ठाकरेंचं नाव निमंत्रण पत्रिकेतून पूर्णपणे वगळण्यात आलं आहे. त्यामुळे तैलचित्रावरून वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच कारण मात्र वेगळ सांगण्यात आलंय.