मुंबई : देशातील सर्व फिल्म सोसायट्यांची शिखर संस्था असलेल्या फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडियाने सत्यजित राय जन्मशताब्दी निमित्त सर्वोत्तम फिल्म सोसायटीचा पुरस्कार सुरू केला असून पहिल्याच वर्षी हा पुरस्कार फेडरेशनच्या पश्चिम विभागात प्रभात चित्र मंडळ या फिल्म सोसायटीला जाहीर झाल्याचे पत्रक फेडरेशनचे अध्यक्ष किरण व्ही. शांताराम यांनी वृत्तपत्राकडे पाठविले आहे.
प्रभात चित्र मंडळ ही महाराष्ट्रातील अग्रगण्य फिल्म सोसायटी आहे. तिने ५० वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण केली असून नव्या तरूण टीमने जोमाने फिल्म सोसायटी चालवली आहे. प्रभात चित्र मंडळाचे स्वत:चे चित्रपटविषयक पुस्तकांचे ग्रंथालय असून रूपवाणी हे चित्रपट संस्कृतीचा प्रसार करणारे त्रैमासिक प्रभाततर्फे प्रकाशित केले जाते. दर महिन्याला दोन-तीन चित्रपट आणि दरवर्षी चित्रभारती हा महोत्सव भरवला जातो.
Satyajit Ray Memorial Award to Prabhat Chitra Mandal