Crime News Live Updates
04 Sep 2025 01:30 PM (IST)
नाशिक मधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने कुत्रे-मांजरींना विष देऊन संपवल्याचे समोर आले आहे. जवळपास 20 पेक्षा जास्त भटके श्वान आणि काही मांजरी ठार केल्याचे समोर आले आहे. हे करण्यामागचं उद्देशष्य केवळ इतकंच की डुक्करांचे रक्षण, डुकरांना त्रास होऊ नये. ही घटना नाशिकच्या सटाणा तालुक्यातील अंबासन गावात समोर आला आहे. डुक्कर पालकाने आपल्या डुक्करांचे रक्षण करण्यासाठी शांत डोक्याने हे क्रूर कृत्य केलं आहे. त्यामुळे प्राणीप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
04 Sep 2025 01:00 PM (IST)
गुरुवार पेठेतील सोसायटीत पार्किंगमधील वीज मीटर आणि दुचाकींना पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे सोसायटीत मोठ्या प्रमाणावर धूर झाला. तत्काळ अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेऊन रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला गेला. दरम्यान, आग नेमकी का लागली हे समजू शकले नाही.
गुरुवार पेठेत झेबा शेल्टर्स सोसायटी आहे. तळमजल्यावर वीज मीटर तसेच दुचाकी वाहने लावली जातात. दरम्यान, या सोसायटीत बुधवारी (३ सप्टेंबर) पहाटे साडेतीनच्या सुमारास वीज मीटर तसेच दुचाकींनी पेट घेतला. सोसायटीतील रहिवासी गाढ झोपेत होते. तळमजल्यावर दुचाकी, वीज मीटरला आग लागल्याने मोठ्या प्रमाणावर धूर झाला. आग भडकल्याने रहिवासी घाबरले. नागरिकांनी अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत पाण्याचा मारा करुन दहा ते पंधरा मिनिटात आग आटोक्यात आणली. परंतु, सोसायटीत मोठ्या प्रमाणावर धूर झाल्याने रहिवासी घाबरले गेले होते. जवानांनी सोसायटीतील ४६ रहिवाशांना बाहेर काढले. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. आगीमागचे कारण समजू शकले नाही.
04 Sep 2025 12:40 PM (IST)
शनिवारवाडा परिसरात दुचाकी लावून देखावे पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाची दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत तरुणाने फरासखाना पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार तरुण वाकड परिसरात राहतो. शनिवारी (३० ऑगस्ट) तरुण मित्रासोबत देखावे पाहण्यास आला होता. शनिवारवाडा परिसरातील सूर्या हॉस्पिटजवळ त्याने दुचाकी लावली. दुचाकी चोरून चोरटे पसार झाले. पोलीस हवालदार मानमोडे तपास करत आहेत.
04 Sep 2025 12:20 PM (IST)
कुटुंबियांसोबत देखावे पाहण्यास आल्यानंतर रिक्षा शनिवारवाडा परिसरात पार्ककरून गेले असता अज्ञाताने रिक्षाची चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चोरट्यांवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत ३८ वर्षीय रिक्षाचालकाने तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, रिक्षाचालक कुटुंबीयासोबत रविवारी (३१ ऑगस्ट) दुपारी देखावे पाहण्यास आला होता. त्याने शनिवारवाडा येथे रिक्षा लावली. त्यावेळी चोरट्यांनी बनावट चावीचा वापर करुन रिक्षा चोरून नेली. देखावे पाहून रिक्षाचालक तेथे आला. तेव्हा रिक्षा जागेवर नसल्याचे आढळून आले. नंतर त्याने पोलिसांकडे तक्रार दिली. चोरीला गेलेल्या रिक्षाची किंमत ७५ हजार रुपये असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलीस हवालदार कोकाटे तपास करत आहेत.
04 Sep 2025 12:00 PM (IST)
हिंजवडी आयटी पार्कमधील एका कंपनीच्या संचालकांनी नोकरी देण्याच्या बहाण्याने आयटी अभियंत्यांची लाखोंची फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात हिंजवडी पोलिसांनी एका संचालकाला अटक केली असून महिला संचालकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात २३ ऑगस्ट रोजी पहिला गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आता पुन्हा १ सप्टेंबर रोजी दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी जॉब प्लेसमेंटच्या नावाखाली फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांकडून प्रत्येकी दीड ते अडीच लाख रुपये उकळले. सुरुवातीला काही दिवस ऑनलाईन प्रशिक्षण दिले आणि त्यांच्याकडून काम करून घेतले. मात्र कोणताही प्रकल्प न देता वेगवेगळी कारणे सांगून त्यांना कामावरून कमी करण्यात आले. अशा प्रकारे २७ लाख ३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात आरोपी उपेश रणजित पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे. तर महिला संचालक आणि आणखी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत फसवणूक झालेल्या आयटी फ्रेशर्स तरुणांचा आकडा ४०० पेक्षा अधिक असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस तपास करत असून आणखी काही तरुण यामध्ये पीडित असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
04 Sep 2025 11:40 AM (IST)
पुणे शहरात सातत्याने जड वाहनांचे अपघात होत असून, पुन्हा भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव वेगातील सिमेंट मिक्सरने दुचाकीस्वारासह दोघांना चिरडल्याची घटना घडली आहे. दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला हे मात्र समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी सिमेंट मिक्सरच्या चालकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फुरसूंगीतील मंतरवाडी चौकातील शेल पेट्रोल पंपाजवळ सोमवारी सकाळी ही घटना घडली आहे. संतोष प्रल्हाद कांबळे (वय ३९, रा. कवडगाव, अहिल्यानगर) आणि सुदर्शन गोरख पुलावळे (वय ३८, रा. उरूळी देवाची) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. सिमेंट मिक्सर चालक नागेश नाना कोरके (वय ३०, रा. उपळाई बुद्रुक, ता. माढा, जि. सोलापूर) याच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
04 Sep 2025 11:20 AM (IST)
माळेगाव पोलिसांनी तत्परता दाखवत मिनीबस चोरीचा गुन्हा अवघ्या काही तासांत उघडकीस आणला. विशेष म्हणजे चोरीच्या या प्रकारामागे मिनीबसचाच चालक असल्याचे निष्पन्न झाले असून, पोलिसांनी त्याला अटक करून ७ लाख रुपये किमतीची मिनीबस जप्त केली आहे. माळेगाव परिसरात अलीकडेच चोरीच्या घटना वाढू लागल्याने पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी गुन्हेगारांवर लगाम घालण्यासाठी विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार माळेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सचिन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने गस्त वाढवून तपास यंत्रणा अधिक सक्रिय केली होती.
बीड शहरातील स्वराज्य नगर भागात चाकूने हल्ला करून एका 25 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या हत्येचं कारण समोर आले असून मित्रात किरकोळ वाद झाला आणि मित्रानेच मित्राची धारदार शस्त्राने हत्या केली. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी पाठलाग करून बड्या शिताफीने अवघ्या काही तासांत अटक केली आहे. काल मध्यरात्री दोन वाजता विजय काळे हा गणपतीच्या समोर मित्रांसोबत नृत्य करत होता. त्याने त्या नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील पोस्ट केला होता. मात्र थोड्याच वेळात मित्र अभिषेक गायकवाड याच्यासोबत किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर आरोपी अभिषेकने विजयच्या छातीत धारदार शस्त्राने वार केला. त्याला उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला.