महाराष्ट्रात सुरु असलेल्या शिवभोजन थाळीला मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीनं घेण्यात आलाय. महाराष्ट्र राज्य सरकारने एका महिन्यासाठी ही योजना सुरु करून गोरगरीब जनतेला शिवभोजन पथाळी मोफत देण्याचा निर्णय घेतला होता. कोरोनाची दुसरी लाट आणि राज्यात त्यासाठी घालण्यात येणारे निर्बंध यांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता.
१५ एप्रिलपासून ही योजना राज्यात सुरु करण्यात आली होती. अन्न आणि नागरी पुरवठा विभागामार्फत या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत असून १५ एप्रिल ते १७ जून या कालावधीत ९० लाख ८१ हजार ५८७ थाळ्यांचे वाटप करण्यात आल्याची आकडेवारी सरकारनं जाहीर केलीय. या मुदतवाढीसंदर्भातला शासन निर्णय १७ तारखेलाच काढण्यात आला आहे.[read_also content=”मुंबईत आजपासून ३० ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरू, ठाणे आणि नवी मुंबईतही मिळणार लस, असं आहे धोरण https://www.navarashtra.com/latest-news/vaccination-for-30-to-44-age-group-begins-from-today-in-mumbai-nraj-144316.html”]
शिवभोजन थाळीअंतर्गत राज्यात आता नव्या ४४१ केंद्रांना मंजुरी मिळालीय. त्यामुळे दैनंदिन थाळ्यांची संख्या ही ४४ हजार ३०० नं वाढणार आहे. राज्यात आतापर्यंत १३३२ शिवभोजनं केंद्र उभारण्यात आली आहेत. नव्याने मंजुरी मिळालेल्यांपैकी काही केंद्रं सुरु झाली असून काही केंद्रं ही लवकरच सुरू होतील, असं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलंय. सध्या राज्यात १०४३ केंद्र कार्यरत आहेत.