भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज (रविवार) टी-२० वर्ल्ड कपचा पहिला सामना होणार आहे. दोेन्ही संघ दुबईच्या मैदानात खेळण्यास सज्ज झाले आहेत. सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या संघाबाबत मतं मांडली होती. दरम्यान, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारतीय संघाला झोपच्या गोळ्या खायला द्या, अशा प्रकारचा सल्ला पाकचा कर्णधार बाबर आझमला दिला आहे.
सर्वात पहिले सामन्याला सुरूवात होण्यापूर्वी भारतीय संघाला झोपेच्या गोळ्या खायला दे. तसेच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला इन्स्टाग्राम हाताळण्यापासून थांबवा आणि तिसरा प्रयत्न असा करा की, भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी स्वत: मैदानात फलंदाजी करायला येणार नाही. कारण संपूर्ण जगभरातून सर्वश्रेष्ठ फलंदाजांपैकी धोनी एक उत्कृष्ट खेळाडू आहे. तसेच तो चांगल्या फॉर्मात खेळत आहे. अशा प्रकारचा हास्यास्पद सल्ला शोएब अख्तरने दिला आहे.
[read_also content=”लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपीला डेंग्यूची लक्षणे, तरूंगातून थेट रूग्णालयात दाखल https://www.navarashtra.com/latest-news/lakhimpur-kheri-violence-main-accused-ashish-mishra-contracts-dengue-nrms-195690.html”]