जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मावळकरांना थेट आवाहन केलं आहे.मावळ तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मुरलीधर मोहोळ यांनी स्थानिक आमदार आणि पालकमंत्री अजित पवार यांचं नाव न घेता टोला लगावला.ते म्हणाले, “मावळात कोणतंही काम पालकमंत्र्याशिवाय होऊ शकतं. पालकमंत्री कोण आहे याने काही फरक पडत नाही.पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका भाजपच्या ताब्यात आल्याचं सांगत, आता पुढचं लक्ष्य जिल्हा परिषद असल्याचं मोहोळ यांनी स्पष्ट केलं.गल्ली ते दिल्ली भाजपचं सरकार आहे. आता मावळ तालुक्यातही जिल्हा परिषद सभापती आणि पंचायत समिती सभापती भाजपचाच असला पाहिजे — असा निर्धार कार्यकर्त्यांनी करावा,” असं आवाहन त्यांनी केलं.यावेळी भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं असून, येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मावळातील राजकारण आणखी तापण्याची चिन्हं आहेत.