कल्याणमध्ये पोलीस कर्मचारी विलास भागीत यांना मारहाण झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मारहाण करणाऱ्यांना काही राजकीय नेत्यांचे पाठबळ असल्याचा गंभीर आरोप पोलीस बॉईज संघटनेचे पदाधिकारी विक्रांत बेंद्रे यांनी केला आहे. “पोलीसांनी जगायचं कसं?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी पोलिसांवर होणाऱ्या वाढत्या हल्ल्यांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, या वादादरम्यानचा एक नवा व्हिडिओ समोर आला असून त्यात भाजप नगरसेवक वरुण पाटील आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचे दिसून येत आहे. या घटनेनंतर प्रकरणाची चौकशी सुरू असून संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.