तामिळनाडूतील (Tamil nadu) ६०० मच्छीमार सोमवारी धनुषकोडी आणि कच्चाथीवु बेटादरम्यान मासेमारी करण्यासाठी गेले होते. परंतु श्रीलंकन (Sri Lanka) नौदलाने भारतीय मच्छीमारांवर ( Indian fishermen) हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे. खोल समुद्रात मासेमारी करत असताना, श्रीलंकेच्या नौसैनिकांनी आपल्यावर हल्ला केला, असा आरोप तामिळनाडूतल्या रामेश्वरममधील मच्छीमारांनी केला आहे. या हल्ल्यामध्ये एक मच्छीमार गंभीररित्या जखमी झाला आहे.
श्रीलंकेच्या नौसैनिकांनी दगड आणि बाटल्या फेकून मारल्या, असा आरोप मच्छीमारांनी केला आहे. या हल्ल्यादरम्यान सुरेश (४२) नावाच्या मच्छीमाराच्या डोक्याला मार लागला आहे. रामेश्वरममधील मच्छीमारांनी या घटनेचा निषेध केला आहे. मागच्या आठवडयात भारतीय समुद्र हद्दीत मासेमारी करणाऱ्या सहा श्रीलंकन मच्छीमारांना तटरक्षक दलाने ताब्यात घेतले होते. तटरक्षक दलाने त्यांची बोट जप्त केली व त्या सर्वांना चौकशीसाठी तामिळनाडूतील नागापट्टीनममधील कारायकल बंदरात आणण्यात आले होते.