नागपूर (Nagpur). कोरोना योद्धे म्हणून संबोधण्यात आलेले शिक्षक (Teachers referred to as Corona Warriors) कोविड सेंटरवर (Covid Center) नियमित कर्तव्य बजावत आहेत. मात्र, शासनाकडून मार्च आणि एप्रिल महिन्याचे वेतन (salaries by the government for the months of March and April) देण्यात न आल्याने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये (teachers and non-teaching staff) संतापाची लाट आहे.
[read_also content=”नागपूर/ राज्यभरात वणवण फिरण्यापेक्षा आणि कोरोना मुद्द्यावर इतरांना पत्र लिहिण्यापेक्षा नागपुरातच बसावं; टोमण्याला फडणवीसांनी दिलं प्रत्युत्तर म्हणाले… https://www.navarashtra.com/latest-news/instead-of-wandering-around-the-state-and-writing-letters-to-others-on-the-corona-issue-one-should-stay-in-nagpur-devendra-fadnavis-replied-to-ambedkar-130785.html”]
राज्यातील अनेक शिक्षक करोना प्रतिबंधक काम करीत असून त्यात अनेक शिक्षकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोनामुळे मृत्यू झालेल्या शिक्षकांच्या परिवारांनाही अद्याप विम्याचे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे शासन कायमच शिक्षकांसोबत अन्याय करीत असल्याचा आरोप होत आहे. करोनामध्ये सेवा देत असताना आज अनेक शिक्षकांना करोनाबाधित झाले आहेत. यासाठीचा औषधोपचार, बँकांचे थकलेले हप्ते, विमा हप्ते, त्यावर आकारलेला दंड यामुळे शिक्षक आधीच त्रस्त आहे. त्यात प्रत्येक महिन्याला वेतनासाठी विलंब होत असल्याने बँकांचे दंड भरावे लागते. त्यामुळे सरकारने एप्रिल ते पुढील वर्षाच्या मार्च महिन्यांपर्यंत शिक्षक, शिक्षकेतरांच्या वेतनासाठी निधी उपलब्ध करून द्यावा व शिक्षकांना वेळेत वेतन अदा करावे, अशी मागणी केली जात आहे. याबाबत भाजप शिक्षक आघाडीने मुख्यमंत्री, अर्थमंत्री, शिक्षणमंत्री, शिक्षण संचालक व शिक्षण आयुक्तांना पत्र दिले असून त्यात तातडीने वर्षभराचा निधी मंजूर करण्याची मागणी केली आहे.
‘या’ जिल्ह्यांना वेतन नाही
मुंबईतील उत्तर, पश्चिम दक्षिण, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड व पालघर, नागपूर विभागातील नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, मराठवाड्यातील बीड, नांदेड, औरंगाबाद, उस्मानाबाद अमरावती विभागातील बुलढाणा, वाशीम, अकोला, यवतमाळ, अमरावती, उत्तर महाराष्ट्रातील जळगव, धुळे, नगर, नंदूरबार व नाशिक या जिल्ह्यांमध्ये शिक्षकांना वेतन देण्यासाठी निधीच शिल्लक नसल्याचा आरोप भाजप शिक्षक आघाडीने केला आहे. यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मार्च महिन्याचे वेतनही शिक्षकांना न मिळाल्याने अनेक आर्थिक संकटांना शिक्षकांना सामोरे जावे लागत आहे.
[blockquote content=”करोना काळात सरकार शिक्षकांची सेवा घेत आहे. मात्र त्यांच्या वेतनासाठी निधीची सुविधा करण्यासाठी कायम दुर्लक्ष केले जाते. यामुळे दोन महिन्यांपासून शिक्षकांचे वेतन थकले आहे. शासनाने त्वरित निधी मंजूर करून वेतन जमा करावे. – अनिल शिवणकर, संयोजक, भाजप शिक्षक आघाडी.” pic=”” name=””]