स्वप्न, ध्येय, आकांक्षा, जिद्द, चिकाटी उराशी बाळगून काहीतरी वेगळे निर्माण करण्यासाठी प्रवाह विरुद्ध पोहणारी काही लोक असतात. पाहिलेली स्वप्न सत्यात उतरवताना त्या व्यक्तीच्या जीवनात बरेच संघर्ष असतात. परंतु, अशा संघर्षातून मार्गक्रमण करीत यशापर्यंत पोहचणारी नागपूरकर महिला अर्थातच प्राजक्ता रतनलाल खांडेकर.
प्राजक्ता खांडेकर या “भारतीय घटनेचा तू शिल्पकार आहे” अशा अजरामर गीताचे गीतकार स्मृतिशेष रंगराज लांजेवार व श्रीमती रूपांजली लांजेवार यांच्या त्या ज्येष्ठ सुकन्या आहेत. त्यांचे आई व बाबा दोन्ही शिक्षक असल्यामुळे नम्रता, शिस्त, प्रामाणिकपणा, अशा वातावरणात त्या राहिल्या. त्यांचे बाबा एक सुप्रसिद्ध गीतकार असल्यामुळे मोठ मोठे साहित्यिक, गीतकार, संगीतकार, गायक यांचा सहवास त्यांना लाभला. “काव्याभिव्यक्ती” ही देणगी त्यांच्या बाबांकडून त्याना लाभली असंही म्हणता येईल. इयत्ता ८ वी मध्ये असतांना प्राजक्तांनी कविता लिहायला सुरुवात केली. लेख, कथा, चारोळी, कविता, गीत, गझल अगदी सहजनेते त्या करतात. चित्रपट क्षेत्रात जाण्याची त्यांची बालपणापासून सुप्त अशी इच्छा होती. त्यामुळेच त्या स्वतः एक शिक्षिका असतांना चित्रपट निर्मितीकडे त्या वळल्या. चित्रपट क्षेत्रात विविध व्यवसायातील लोक आहेत. पण, एका शिक्षिकेने कोणीही गॉडफादर नसतांना चित्रपट निर्माण करण ही अशक्यप्राय गोष्ट शक्य करून दाखवली.
[read_also content=”जातीचे खोटे प्रमाणपत्र लावून ११ उमेदवारांनी मिळवली महाबीजमध्ये नोकरी, अधिकारी व कर्मचा-यांवर बरखास्तीची कारवाई https://www.navarashtra.com/akola/vidarbha/akola/11-candidates-get-jobs-in-mahabeej-by-forging-caste-certificates-nraa-250128.html”]
प्राजक्ता यांनी काही जवळच्या लोकांना सर्वोतोपरी मदत केली पण तेच विरोधक झाले. अनेक कटू अनुभवाचा प्रवास करीत त्यांनी मार्गक्रमण केले. कुटुंब, शाळा व प्रोडक्शन हाऊस सांभाळताना त्याची खूप कसरत असते. या सर्व ठिकाणी घरच्यांचे सहकार्य आवश्यक असते आणि त्यांचे यजमान रतन खांडेकर त्यांची आई रूपांजली भावंड मयूर, दिव्यता, वहिनी प्रणती व त्यांची कन्या कस्तुरी या सर्वांचाच भक्कम पाठिंबा व साथ आहे.
आज त्यांनी कस्तुरी फिल्म एंटरटेन्मेट वर्ल्ड या त्यांच्या प्रोडक्शन हाऊस मधून प्रथम ‘आधार’ ही शॉर्ट मुव्ही केली त्यात लेखन व दिग्दर्शन त्यांचेच होते. आता “प्रेम लागी जीवा” हा त्यांचा मराठी चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रत प्रदर्शित होणार आहे. मुख्य म्हणजे चित्रपटची कथा, पटकथा, संवाद व गीते त्यांनी लिहिली असून एका विशिष्ट भूमिकेत त्या आपल्याला दिसणार आहेत. मराठीचे शिलेदार प्रकाशन नागपूर तर्फे त्यांचे ‘कस्तु्रीगंध’, प्राजक्तगंध’, व ‘बकुळगंध’ हे तीन काव्यसंग्रह प्रकाशित असून ‘आठवणींचा पिसारा’ हा त्यांचा चारोळ्यांचा अल्बम आहे. मराठीचे शिलेदार मध्ये ‘प्राजक्तगंध’ या सदरात त्यांचे दैनिक लेखन सुरू आहेच. तसेच ‘मी टू का वॉर’ व ‘फटाकडी’हे त्यांचे अल्बम सॉंग आहेत. या आधी ‘इंदू’ या मराठी चित्रपटात त्यांचे गीत आहेत. तसेच आताच प्रदर्शित झालेल्या ‘गाठ’ या शॉर्ट मुव्ही करिता त्यांनी लेखन केले. आतापर्यंत प्राजक्ता ताईस विविध क्षेत्रातील २० पुरस्कार मिळाले आहेत.
[read_also content=”दुर्मिळ प्राच्य आर्ली पक्ष्याचे दर्शन म्हणजे पक्षी प्रेमींसाठी एक पर्वणीच, बघण्यासाठी अनेकांची गर्दी https://www.navarashtra.com/latest-news/vidarbha/gondia/rare-oriental-bird-watching-is-a-treat-for-bird-lovers-with-many-flocking-to-see-it-nraa-249964.html”]
“प्रेम लागी जीवा” या त्यांच्या चित्रपटाचे दिग्दर्शक सोमनाथ लोहार हे असून मुख्य कलाकार सोमनाथ लोहार, वैशाली साबळे, रवींद्र ढगे, प्राजक्ता खांडेकर, नागेश थोंटे, जॉनी रावत, राजेंद्र जाधव, माधुरी वरारकर, मयुरी नव्हाते व हर्षद पठाडे हे असून संगीतकार : जब्बार धनंजय आहेत…गायक विनायक बोकेफोडे, सुप्रिया सोरते व मेघाम्बरी आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण लातूर येथील उदगीर तालुक्यात व कोकण येथे झाले आहे. या चित्रपटात नवोदित कलाकारांना त्यांनी संधी दिली आहे. प्रेम लागी जीवा” ही एक संघर्षमय प्रेम कथा असून त्यात काहीतरी वेगळे देण्याचा प्राजक्ताने नक्कीच प्रयत्न केला आहे. अशा या अष्टपैलू भगिणीला त्यांच्या सुवर्णमयी वाटचालीस जागतिक महिला दिनाच्या मनभावन शुभेच्छा.