नवी दिल्ली: कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याचा वेग पहिल्या लाटेपेक्षा कमी आहे. त्यामुळे दुसरी लाट ओसरण्यासाठी वेळ लागणार असून जुलैपूर्वी ही लाट जाणार नसल्याचा दावा प्रसिद्ध व्हायरलॉजिस्ट शाहिद जमील यांनी केला आहे.
डॉ. शाहिद जमील यांनी मंगळवारी एका ऑनलाईन कार्यक्रमाला संबोधित करताना हा दावा केला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने उच्चांक गाठला आहे, असं म्हणणं घाईचं होईल. कोरोनाच्या ग्राफनुसार कर्व्ह चपटा असेल. परंतु तो खालच्या दिशेने सहज जाणार नाही. त्यामुळे जुलैपर्यंत कोरोना विरोधातील लढा सुरू राहिल असं चित्रं आहे, असं सांगतानाच आपल्याला रोजच मोठ्या प्रमाणावरील कोरोना संक्रमणाचा सामना करावा लागणार आहे, असं जमील यांनी सांगितलं.
पहिल्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने कमी होताना दिसत होती. यावेळीही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होताना दिसत आहे.