कोरियन ग्लास स्किनचे सिक्रेट! ट्राय करा हे DIY Masks, पहिल्या वापरतच चेहऱ्यावर दिसून येतील बदल
बदलत्या वातावरणासोबत आपल्या चेहऱ्याची त्वचाही बदलू लागते. चुकीची जीवनशैली, बाहेरचे दूषित वातावरणात यामुळे आपला चेहरा खराब होत असतो. एकदा का चेहरा खराब झाला की यावर अनेक समस्या जाणवू लागतात जसे की, पिंपल्स, कोरडी त्वचा आणि काळे डाग. यामुळे आपल्या सौंदर्य धोक्यात येते. आपल्या स्किनकेअरसाठी जगभरात कोरिया फार फेमस आहे. त्यांच्या नितळ आणि काचेसारख्या चेहऱ्यासाठी लोक नेहमीच त्यांच्या चेहऱ्याचे सिक्रेट जाणून घेण्यास उत्सुक असतात.
कोरियन DIY स्किनकेअर सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. विशेषतः मुलींना कोरियन संस्कृती खूप आवडते. यामुळेच आजकाल मुली खाण्यापासून फॅशन आणि सौंदर्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी कोरियन लोकांना फॉलो करत आहेत. जेव्हा जेव्हा सौंदर्य आणि त्वचेची काळजी येते तेव्हा प्रत्येकाला कोरियन ग्लास स्किन मिळण्याची इच्छा असते. काचेची त्वचा ही खरं तर अल्ट्रा-हायड्रेटेड, गुळगुळीत आणि चमकणारी त्वचा असते ज्यामध्ये चेहऱ्याला छिद्रांशिवाय परिपूर्ण फिनिशिंग असते. मात्र, कधी कधी महागडी स्किन केअर प्रोडक्ट्स देखील तुम्हाला हवी असलेली त्वचा देत नाहीत. तर, आज या लेखात आम्ही तुम्हाला काही कोरियन DIY मास्कबद्दल सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही झटपट चमकणारी त्वचा मिळवू शकता.
तांदळाचे पाणी
कोरियन ग्लास त्वचा मिळविण्याचा सर्वात लोकप्रिय आणि सोपा मार्ग म्हणजे तांदूळ पाणी. हे करण्यासाठी शिजवलेले तांदळाचे पाणी घ्या आणि त्यात मध मिसळून एक मऊ पेस्ट बनवा. हा मास्क चेहऱ्याला लावा आणि 15 मिनिटे तसाच सोडा. नंतर कोमट पाण्याने चेहऱ्यावर धुवून घ्या.
एलोवेरा जेल आणि ग्रीन टी
एलोवेरा जेल ही त्वचेसाठी नेहमीच लोकांची पहिली पसंती राहिली आहे. अशा परिस्थितीत जर त्यात मध आणि ग्रीन टी घातली तर तुमचे चमकदार त्वचेचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. यासाठी पावडर ग्रीन टीमध्ये एलोवेरा जेल आणि मध मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. ही पेस्ट साधारण 20 मिनिटे चेहऱ्यावर तशीच ठेवा आणि नंतर आपला चेहरा पाण्याने धुवा.
हळद, मध आणि दही
कोरियन ग्लास स्किन मिळवण्यासाठी तुम्ही हळद, मध आणि दही यांचा फेस मास्क देखील ट्राय करू शकता. यासाठी तिन्ही साहित्य एकत्रित मिक्स करून स्मूद पेस्ट तयार करा. ही पेस्ट 15 मिनिटे लावून ठेवा आणि नंतर धुवा. हा पॅक हायपरपिग्मेंटेशनचा सामना करण्यासाठी उपयुक्त आहे.
टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.