(फोटो सौजन्य: Pinterest)
सध्याच्या काळात आजारांचे प्रमाण फार झपाट्याने वाढत आहे. यातीलच एक धोकादायक आणि वेगाने वाढणारा आजार म्हणजे डायबिटीज. याचा धोका आजच्या काळात इतका वाढला आहे की मोठेच काय तर लहानांही आजार जडू लागला आहे. याचे मूळ कारण आपली चुकीची जीवनशैली, खाण्या-पाण्यातील बदल आणि व्यायामाचा अभाव असू शकतो. एकदा का तुमच्या रक्तातील साखर अनियंत्रित झाली की मग तीला कंट्रोलमध्ये आणणे खूप कठीण होऊन बसते. अशात आधीपासून काही गोष्टींचे पालन केल्यास या आजरापासून दूर राहता येऊ शकते.
फार पूर्वीपासून नैसर्गिक पदार्थांनी आजारांवर उपचार केले जात आहे. अनेकदा ज्या गोष्टी औषध करू शकत नाहीत ते नैसर्गिक पदार्थ करून दाखवतात. यात कोणतेही रसायन नसल्याकारणाने आरोग्यासाठीही त्यांचे सेवन फायदेशीर ठरते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका विलक्षण औषधी वनस्पतीविषयी माहिती सांगणार आहोत ज्याच्या नियमित सेवनाने तुम्ही अनेक आजारांना दूर ठेवू शकता. ही वनस्पती म्हणजे कडीपत्ता. रोजच्या आहारात याचा समावेश केल्याने रक्तातील साखर संतुलित राहते, पचनक्रिया सुधारते आणि डायबिटीजचा धोकाही टळतो.
जेवणाआधी प्या ही टेस्टी स्मूदी; वजन झपाट्याने कमी होऊन अंथरुणात पडताच लागेल शांत झोप
रक्तातील साखर नियंत्रणात राहते
काडिपत्त्याच्या सेवनाने रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित राहते शिवाय यामुळे इन्सुलिनची संवेदनशीलताही सुधारते. कडीपत्त्यामध्ये असलेले फायटोकेमिकल्स आणि अँटी-डायबेटिक गुणधर्म रक्तातील साखर झपाट्याने कमी करते. यामध्ये असणारे पोषक घटक रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. शिवाय याच्या नियमित सेवनाने आपली कार्यक्षमताही सुधारते. दररोज कडीपत्ता चावून खाल्ल्यास किंवा याकग रस रस करून प्यायल्यास टाईप-2 डायबिटीजच्या रुग्णांना फायदा होतो.
वजन नियंत्रणात राहते
काडिपत्त्यामध्ये असे काही गुण असतात जे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करण्यास मदत करतात. यामुळे शरीरातील अनावश्यक चरबी झपाट्याने कमी होते आणि मेटाबॉलिजम वाढू लागते. यामुळे वजन लवकर वाढत नाही. एवढेच काय तर कडीपत्ता शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल दूर करून हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतो.
पचनसंस्था सुधारते
डायबिटीज असणाऱ्यांना पचनाच्या अनेक समस्या जाणवत असतात. अशात कडीपत्त्याचे सेवन तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते. यामधील नैसर्गिक घटक पचनसंस्थेचे कार्य सुरळीत करण्यास मदत करतात, ज्यामुळे गॅस, ऍसिडिटी आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या कमी होतात. याच्या नियमित सेवनाने यकृताच्या कार्यक्षमतेही वाढ होते.
कसे सेवन करावे?
आता जर तुम्हाला रोज याचे सेवन कसे करावे असा प्रश्न पडत असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही यापासून चविष्ट अशी चटणी बनवू शकता. ही चटणी एकदाच बनवून, तिला साठवून तुम्ही अनेक दिवस याचे सेवन करू शकता. ही चटणी चवीला तर अप्रतिम लागेलच शिवाय ही चटणी तुमच्या आरोग्याचीही पुरेपूर काळजी घेईल. याशिवाय तुम्ही भाजी किंवा डाळ बनवताना तडक्यात कडीपत्त्याचा वापर करू शकता. यामुळे तुमच्या पदाथाची चवही वाढेल.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.