(फोटो सौजन्य: istock)
सध्याचे जीवन हे धावपळीचे आणि व्यस्त जीवन आहे. आपल्या कामाच्या गडबडीत आपण इतके गुंतून जातो की बऱ्याचदा यामुळे आपले आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ लागते. आपल्या शरीराला आवश्यक जीवनसत्त्वांची गरज असते आणि हे पोषक घटक शरीराला न मिळाल्यास आपल्याला आरोग्याच्या समस्या जाणवू लागतात. यातील एक वाढत चाललेली समस्या म्हणजे व्हिटॅमिन B12 ची कमतरता. झोपेतून उठताच थकवा जाणवणे, सतत चिडचिड होणे आणि अशक्तपणा जाणवणे ही व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेची काही लक्षणे आहेत.
अनेकांना असे वाटते को फक्त मांसाहारातूनच आपल्या शरीराला व्हिटॅमिन B12 मिळते मात्र असे नाही. बऱ्याच जणांना हे ठाऊक नाही पण काही साध्या भाज्यांच्या सेवनाने तुम्ही शरीरातील व्हिटॅमिन B12 ची कमतरता भरून काढू शकता. त्यामुळे आता बाजारातील महागडे सप्लिमेंट्स विसरा आणि स्वस्त भाज्यांचे सेवन सुरु करा.
भोपळा
भोपळा ही अनेकांची नावडती भाजी आहे मात्र आरोग्यासाठी याचे सेवन फार फायद्याचे ठरू शकते. भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन B12 चे अधिक असते. शिवाय याचे नियमित सेवन पचनसंस्थेचे कार्य सुधारते. त्यामुळे ही स्वस्त भाजी आजपासून खायला सुरुवात करा. बाजारात तुम्हाला ती सहज उपलब्ध होईल. तुम्ही यापासून अनेक चविष्ट असे पदार्थ तयार करू शकता.
पालक
पालेभाज्या या नेहमीच आपल्या आरोग्यासाठी फायद्याच्या ठरत असतात. पालकही त्यातीलच एक आहे, यात लोह, फायबर्स आणि व्हिटॅमिन B12 भरपूर प्रमाण आढळते. जर तुम्हाला शरीरात व्हिटॅमिन B12 ची कमतरता जाणवत असेल तर आहारात पालकचा आवर्जून समावेश करा. याच्या नियमित सेवनाने शरीरातील रक्ताची कमतरताही दूर होते.
जेवणाआधी प्या ही टेस्टी स्मूदी; वजन झपाट्याने कमी होऊन अंथरुणात पडताच लागेल शांत झोप
कोबी
कोबीमध्ये फायबर्स, जीवनसत्त्वे आणि अनेक अँटीऑक्सिडंट्स आढळले जातात जे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. शरीरातील व्हिटॅमिन B12 ची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही आहारात कोबीचा समावेश करू शकता. यापासून कोबीची भाजी, सूप, पराठे असे अनेक पदार्थ बनवले जाऊ शकतात.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.