भंडारा (Bhandara) : कपडे धुण्यासाठी गेलेल्या तरुणीवर रानडुकराने हल्ला केल्याची घटना घडली आहे. भंडारा जिल्ह्याच्या पालांदुर येथे हा प्रकार घडला आहे. या अपघातात तरुणीच्या डाव्या पायाला जबर दुखापत झाली आहे.
[read_also content=”नागपूर/ नागपूरच्या काव्यने दहाव्या वर्षी लिहिली भगवद्गीता, आशिया बुकमध्ये नोंद https://www.navarashtra.com/latest-news/the-bhagavad-gita-written-by-a-kavy-from-nagpur-in-the-tenth-year-is-recorded-in-the-asia-book-nrat-217018.html”]
रोहिणी चंद्रशेखर बारापात्रे वय २२ असं या तरुणीचे नाव आहे. राहत्या घरीच कपडे धुत असताना अचानक रानडुकराने तरुणीवर हल्ला केला. यात तरुणीच्या डाव्या पायाला जबर जखम झाली. उपचारांसाठी तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेनं परिसरातून भीती व्यक्त होत आहे.
नेहमीप्रमाणे रोहिणी आपल्या घराच्या मोकळ्या जागेत कपडे धूत होती. कपडे धूत असताना रानटी डुक्कराने अचानकपणे रोहिणी वर हल्ला चढविला. हा हल्ला इतरा भयंकर होता की क्षणातच रोहिणी बाजूला फेकली गेली. रानटी डुक्कराने तिच्या पायाला चिरत नेत जखमी केले. मात्र, रोहणीने प्रसंगावधान राखत आरडाओरडा केल्याने लगेचच लोक जमा झाले. लोक जमा झाल्याने उडालेल्या गोंधळात डुक्कराने घटनास्थळावरून धूम ठोकली.
या हल्ल्यात रोहिणीचा पाय रक्तबंबाळ झाल्याने तिला तात्काळ ग्रामीण रुग्णालय पालांदूर येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले असून पुढील उपचारासाठी भंडारा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले आहे. घटनेची माहिती वनविभागाला देत पंचनामा करण्यात आला असून सध्या रोहिणीवर सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचार सुरू आहेत.