• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • A Big Leader From Ambegaon Taluka Is Likely To Join Shiv Sena

आंबेगाव तालुक्यात राजकीय भूकंप होणार! बडा नेता शिवसेनेत प्रवेश करणार?

आढळराव पाटील यांची सध्याची राजकीय परिस्थिती आणि भवितव्य पाहता ते पुन्हा शिवसेना एकनाथ शिंदे गटात स्वगृही परतणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 30, 2025 | 04:22 PM
आंबेगाव तालुक्यात राजकीय भूकंप होणार! बडा नेता शिवसेनेत प्रवेश करणार?

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • आंबेगाव तालुक्यात राजकीय भूकंप होणार!
  • बडा नेता शिवसेनेत प्रवेश करणार?
  • बैठकीत कार्यकर्त्यांची जाहीर नाराजी व्यक्त
रांजणी/रमेश जाधव : शिरूर लोकसभेची उमेदवारी मिळावी म्हणून २०२४ साली शिवसेना एकनाथ शिंदे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात प्रवेश केला. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे मन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात रमत नसल्याचे संकेत मिळत आहेत. आढळराव पाटील यांची सध्याची राजकीय परिस्थिती आणि भवितव्य पाहता ते पुन्हा शिवसेना एकनाथ शिंदे गटात स्वगृही परतणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्या बरोबरीने गेली दोन वर्ष पक्षाचे काम करत असताना आढळराव पाटील यांचा राजकीय आलेख कमी होत चालला असल्याचे दिसून आले. त्यामुळेच त्यांनी पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला असावा, असा राजकीय तज्ञांना अंदाज आहे. २००४ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवसेनेमध्ये प्रवेश करून शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रथम शिरूर लोकसभेची निवडणूक लढवली. आपल्या पहिल्याच खासदारकीच्या निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बालेकिल्यात आढळराव पाटील विजयी झाले.

सलग तीन वेळा शिरूर लोकसभेचे प्रतिनिधित्व करणारे आढळराव पाटील शिवसैनिकांच्या मनात भरले. पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेना तारण्याचे काम खऱ्या अर्थाने आढळराव पाटील यांनी केले. दरम्यान 2019 साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. मात्र पराभवानंतर देखील शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपल्या लांडेवाडी येथील निवासस्थानी असणारा प्रत्येक रविवारी भरणारा जनता दरबार चालूच ठेवला. ते सातत्याने लोकसंपर्कात राहिले आणि अद्यापही आहेत. दरम्यानच्या कालखंडात उद्धव ठाकरे यांच्या दरबारात आढळराव पाटील यांना मानाचे स्थान मिळत नसल्याने त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. शिंदेंचे विश्वासु सहकारी म्हणून आढळराव पाटील पश्चिम महाराष्ट्रात परिचित झाले.

2024 साली पुन्हा लोकसभेच्या निवडणुका आल्या. राज्यात भाजपा- शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशी महायुती असल्याने शिरूर लोकसभेची उमेदवारी साहजिकच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडे गेली. त्यामुळे उमेदवारी मिळण्यासाठी आढळराव पाटील यांनी पुन्हा शिवसेना एकनाथ शिंदे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात प्रवेश केला. गेली दिड दोन वर्ष ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कामकाज अत्यंत इमाने – इतबारे करत आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून आढळराव पाटील यांनी आंबेगाव तालुक्याच्या राजकारणात देखील सक्रिय सहभाग घेतला आणि विधानसभा निवडणुकीत वळसे पाटील यांना साथ दिली. त्यांना आंबेगांव विधानसभेच्या निवडणुकीत विजयी करण्यामध्ये आढळरावांचा सिंहाचा वाटा राहिला.

बैठकीत कार्यकर्त्यांची जाहीर नाराजी व्यक्त

शिवसेना एकनाथ शिंदे गटातील प्रवेशाबाबत होत असलेल्या चर्चा आणि घडामोडी संदर्भात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मंचर नगर पंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मोनिका सुनिल बाणखेले या माझ्या विचाराच्या उमेदवार होत्या. नगरपंचायत निवडणुकीत त्यांचा झालेला पराभव हा क्रॉस वोटींगमुळे झाला. पराभवानंतर माझ्या कार्यकर्त्यांची आणि माझी बैठक झाली. त्या बैठकीत माझ्या कार्यकर्त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. माझ्या आगामी राजकीय राजकारणासंबंधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्याबरोबर बोलणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Web Title: A big leader from ambegaon taluka is likely to join shiv sena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2025 | 04:22 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • Eknath Shinde
  • shivsena

संबंधित बातम्या

Municipal Election 2026: राज्यातील १४ ठिकाणी भाजप-शिंदे गटाची युती फुटली; कोणत्या आहेत या महापालिका?
1

Municipal Election 2026: राज्यातील १४ ठिकाणी भाजप-शिंदे गटाची युती फुटली; कोणत्या आहेत या महापालिका?

पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक रंगतदार ठरणार; भाजप- राष्ट्रवादीत होणार सत्तासंघर्ष
2

पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक रंगतदार ठरणार; भाजप- राष्ट्रवादीत होणार सत्तासंघर्ष

Nagpur Municipal Election 2026: नागपुरात भाजपचं भिजत घोंगड..; 151 जागांसाठी ३०० उमेदवारांना तयारीत राहण्याचे आदेश
3

Nagpur Municipal Election 2026: नागपुरात भाजपचं भिजत घोंगड..; 151 जागांसाठी ३०० उमेदवारांना तयारीत राहण्याचे आदेश

Pune Municipal 2026: पुण्यात ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस एकत्र लढणार..; सतेज पाटील-सचिन अहिर यांच्याकडून शिक्कामोर्तब
4

Pune Municipal 2026: पुण्यात ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस एकत्र लढणार..; सतेज पाटील-सचिन अहिर यांच्याकडून शिक्कामोर्तब

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Solapur News : शिक्षणाबरोबरच सृजनात्मक कला अवगत करावी; ‘सृजनरंग’ महोत्सव पारितोषिक समारंभ उत्साहात

Solapur News : शिक्षणाबरोबरच सृजनात्मक कला अवगत करावी; ‘सृजनरंग’ महोत्सव पारितोषिक समारंभ उत्साहात

Dec 30, 2025 | 06:22 PM
पाकिस्तान संघाने थोडं तरी लाजायला हवं होतं! स्वतःच्याच खेळाडूंचे पैसे घातले घशात 

पाकिस्तान संघाने थोडं तरी लाजायला हवं होतं! स्वतःच्याच खेळाडूंचे पैसे घातले घशात 

Dec 30, 2025 | 06:18 PM
दाक्षिणात्य अभिनेते Mohanlal यांच्या आईचे निधन, 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दाक्षिणात्य अभिनेते Mohanlal यांच्या आईचे निधन, 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Dec 30, 2025 | 06:10 PM
Exam Tips: गुण वाढवण्याची सोपी किल्ली ‘बोर्ड परीक्षेपूर्वी सुधारा हस्ताक्षर’

Exam Tips: गुण वाढवण्याची सोपी किल्ली ‘बोर्ड परीक्षेपूर्वी सुधारा हस्ताक्षर’

Dec 30, 2025 | 06:03 PM
Kolhapur News: आम्ही जगायचं की मरायचं? पन्हाळा तालुक्यात वन्य प्राण्यांची दहशत, शेतकऱ्यांचा आक्रोश

Kolhapur News: आम्ही जगायचं की मरायचं? पन्हाळा तालुक्यात वन्य प्राण्यांची दहशत, शेतकऱ्यांचा आक्रोश

Dec 30, 2025 | 06:01 PM
Maharashtra Politics : …पण विचारधारेशी तडजोड करून मला उमेदवारी नको; शरद पवारांच्या कार्यकर्त्याने नाकारला AB फॉर्म

Maharashtra Politics : …पण विचारधारेशी तडजोड करून मला उमेदवारी नको; शरद पवारांच्या कार्यकर्त्याने नाकारला AB फॉर्म

Dec 30, 2025 | 05:47 PM
५ वर्षांपासून ‘ही’ समस्या, आमिर खानच्या मुलीला झालं तरी काय? वेदना व्यक्त करत म्हणाली…

५ वर्षांपासून ‘ही’ समस्या, आमिर खानच्या मुलीला झालं तरी काय? वेदना व्यक्त करत म्हणाली…

Dec 30, 2025 | 05:42 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Virar : भाजपचे नाराज कार्यकर्ते प्रचारात दिसतील – खा. हेमंत सावरा

Virar : भाजपचे नाराज कार्यकर्ते प्रचारात दिसतील – खा. हेमंत सावरा

Dec 30, 2025 | 03:36 PM
THANE : मनसेकडून पवन पडवळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल; शिवसेना भाजप युतीला आव्हान

THANE : मनसेकडून पवन पडवळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल; शिवसेना भाजप युतीला आव्हान

Dec 30, 2025 | 03:33 PM
Navi Mumbai : “कोपरखैरणे प्रभागातील पुढऱ्यांनी फक्त टेंडर काढायची कामं केली” – शिरीष पाटील

Navi Mumbai : “कोपरखैरणे प्रभागातील पुढऱ्यांनी फक्त टेंडर काढायची कामं केली” – शिरीष पाटील

Dec 29, 2025 | 07:30 PM
Solapur News : तृतीयपंथी Ayyub Sayyad च्या खून प्रकारणातील तिघांना अटक

Solapur News : तृतीयपंथी Ayyub Sayyad च्या खून प्रकारणातील तिघांना अटक

Dec 29, 2025 | 07:23 PM
Sindhudurg : नववर्षाच्या जल्लोषासाठी भोगवे हाऊसफुल्ल!

Sindhudurg : नववर्षाच्या जल्लोषासाठी भोगवे हाऊसफुल्ल!

Dec 29, 2025 | 06:43 PM
Mumbai : विकासाच्या मुद्द्यांवरच निवडणूक हवी, काँग्रेस-वंचित आघाडीवर वर्षा गायकवाडांचं वक्तव्य

Mumbai : विकासाच्या मुद्द्यांवरच निवडणूक हवी, काँग्रेस-वंचित आघाडीवर वर्षा गायकवाडांचं वक्तव्य

Dec 29, 2025 | 06:36 PM
Ahilyanagar : निवडणूक आयोगाकडून अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

Ahilyanagar : निवडणूक आयोगाकडून अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

Dec 29, 2025 | 06:23 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.