शिक्षक(Teacher) होण्यासाठी प्रयत्न करत असलेल्यांना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मोठा दिलासा दिला आहे. शिक्षक पात्रता परीक्षा योग्यता प्रमाणपत्राची (TET Certificate Validity Period Extended) वैधता आता अमर्याद कालावधीसाठी वाढवण्यात आली आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात येणाऱ्या शिक्षकांना फायदा होणार आहे.
[read_also content=”बाबो ! चीनकडे आहे खऱ्या सूर्यापेक्षाही १० पट जास्त शक्तीशाली कृत्रिम सूर्य, तापमान ऐकाल तर चकितच व्हाल https://www.navarashtra.com/latest-news/artificial-sun-of-china-is-more-powerful-than-real-sun-nrsr-137329.html”]
याआधी या प्रमाणपत्राची वैधता ७ वर्षांसाठी होती. या कालावधीत शिक्षकाची नोकरी लागली नाही तर इच्छुकांना पुन्हा परीक्षा द्यावी लागत होती. त्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने हा निर्णय बदलत प्रमाणपत्राची वैधता अमर्याद कालावधीसाठी वाढवली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी ही घोषणा केली आहे.
The validity period of Teachers Eligibility Test (TET) qualifying certificate extended from 7 years to lifetime with retrospective effect from 2011: Ministry of Education pic.twitter.com/pMh3NtrLA3 — ANI (@ANI) June 3, 2021
पूर्वलक्षी प्रभावासह २०११ या वर्षांपासून हा नियम लागू होणार आहे. त्यामुळे शिक्षक भरतीसाठी २०११पासूनचे उमेदवार ग्राह्य धरले जातील. शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना या निर्णयामुळे रोजगाराच्या संधी मिळण्यास मदत होईल, असं केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल म्हणाले.
[poll id=”50″]
ज्या उमेदवाराचे शिक्षक पात्रता प्रमाणपत्र २०११ या वर्षानंतर बाद झालं आहे. अशा सर्व उमेदवारांना नव्याने प्रमाणपत्र जारी करण्याचे आदेश केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत.






