मुंबई : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर केलेल्या बोचक टीकेचे पडसाद आता सर्वत्र दिसू लागले आहेत. पडळकर यांच्या टीकेवर अनेक जणांनी नाराजी व्यक्त केली आहे. या सगळ्या मध्ये शिवसेनेने सुद्धा आपले मत पाडळकरांविरुद्ध व्यक्त केले आहेत. दरम्यान या सगळ्या प्रकावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पडळकरांवर बोचरी टीका केली आहे.
जितेंद्र आव्हाडांचा पडळकरांना टोला
‘बातमीत राहायचे असेल शरद पवारांबद्दल खालच्या पातळीत बोलावे लागते, म्हणून टीका होत असल्याचा टोला आव्हाडांनी लगावला. महाराष्ट्राच्या राजकारणात हे सर्वश्रूत आहे की, जोपर्यंत शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर आपण टीका करत नाही. तोपर्यंत मीडिया आपली दखल घेणार नाही. आपल्याला बातमीत राहायचे असेल तर बाकी काही बोलले नाही तरी चालेल. पण, शरद पवार यांच्याबद्दल खालच्या पातळीत बोला. काम झालेच म्हणून समजा’ असे ट्विट आव्हाड यांनी केले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात हे सर्वश्रूत आहे कि, जोपर्यं शरदचंद्रजी पवार साहेबांवरती खालच्या पातळीवर आपण टिका करत नाही तोपर्यंत मीडिया आपली दखल घेणार नाही. आपल्याला बातमीत राहायचे असेल तर बाकी काही बोलला नाही तरी चालेल पण श्री. शरद पवार साहेबांबद्दल खालच्या पातळीत बोला काम झाले
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 30, 2021
[read_also content=”मराठा आरक्षण फेरविचार याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतर छत्रपती संभाजीराजेंची पहिली प्रतिक्रीया, म्हणाले की… https://www.navarashtra.com/kolhapur-news-marathi/chhatrapati-sambhaji-rajes-first-reaction-after-the-court-rejected-the-maratha-reservation-reconsideration-petition-said-that-nrdm-149824/”]
गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले?
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सोलापुरात बुधवारी सायंकाळी दगडफेक करण्यात आली आहे. तत्पूर्वी सकाळी त्यांनी सोलापूर येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ‘शरद पवार हे साडेतीन जिल्ह्यांचे स्वामी आहेत. ते मोठे नेते आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोणी तसं मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे,’ अशी बोचरी टीका पडळकर यांनी केली होती. तसेच ‘तीन खासदार अन साडेतीन जिल्ह्याचा पक्ष असणाऱ्या ‘भावी’ पंतप्रधान शरद पवार यांना पुढील तीस वर्षांच्या ‘भावी’ पंतप्रधानपदासाठी शुभेच्छा आहेत’ अशी कोपरखळी त्यांनी मारली. मी लहान असल्यापासून शरद पवार हे भावी प्रधानमंत्री आहेत, त्यांना भावी प्रधानमंत्रीपदासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. पुढं कुठल्यातरी लवणात ससा सापडेल अशी अपेक्षा आहे, असा चिमटा पडळकर यांनी पवारांना काढला.