(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
MasterChef India 9 मध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करणारी अर्चना धोत्रे या रूपाली विकास जाधवसोबत जोडीने स्पर्धेत सहभागी होताना दिसल्या. एका सामान्य कुटुंबातून आलेल्या अर्चना गेल्या काही काळापासून स्वयंपाकाला व्यवसायाचे रूप देत टिफिन आणि घरगुती जेवण पुरवतात. आणि त्यांनी आता त्यांची याच क्षेत्रात नवी ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावरून आपल्या खास पाककृती शेअर करत त्यांनी प्रत्येकाच्या घरातघरात ओळख निवळी आहे. केवळ पाककलेचे कौशल्य दाखवण्यासाठीच नव्हे, तर आयुष्याला नवी दिशा देऊन कुटुंबाचा अभिमान वाढवण्याच्या ध्येयाने अर्चनाने मास्टरशेफमध्ये सहभाग देखील घेतला आहे. आता अर्चना धोत्रे यांनी नवराष्ट्रसोबत बातचीत करताना त्यांचा खडतर प्रवास सांगितला आहे, ज्यामध्ये त्या भावुक होताना दिसल्या आहेत.
अर्चना धोत्रे यांच्या वडिलांचे त्या लहान असतानाच निधन झाले, त्यांनी त्यांचा वडिलांनाचा चेहरा देखील पाहिला नाही. घरात खडतर परिस्थिती असताना त्यांनी स्वतःमधील जिद्द आणि कष्टाळू स्वभाव तसाच ठेवला, आणि या परिस्थितीवर त्यांनी मत मिळवली. नवराष्ट्रच्या मुलाखतीत, त्यांनी वडिलांबद्दल सांगताना म्हणाल्या की, ‘मी वडिलांना पाहिलं नाही, माझी मोठी बहीण देखील लहान होती आणि आम्ही घरात पाच भावंडं होतो. मी अडीच वर्षाची असतानाच माझे वडील गेले. आणि आईने आमचा सांभाळ केला, आम्हा भावंडाला मोठं केलं.’
तसेच अर्चना धोत्रे या सोशल मीडियावरून त्यांच्या पाककला लोकांसोबत शेअर करतात, हे करत त्यांनी त्यांची आवड देखील जपली. आणि त्यांना लोकांनी भरभरून प्रतिसाद देखील दिला. यासगळ्याबद्दल भावुक होऊन त्या म्हणाल्या, ‘माझ्या मनात नेहमी एक प्रश्न येत असे, की लोकं पुढे जात आहेत मग मी का नाही? मी स्वतःलाच सांगायचे आणि समजवायचे की मी नवीन काय करू शकते, मी ती जिद्द आत्मसात करायचे. आणि मला वाटलं की मी खूप छान जेवण बनवते यामध्येच काही करावं, आता सोशल मीडियाची क्रेझ असल्यामुळे मी माझं स्वतःच युट्युब चॅनेल उघडलं ज्यामध्ये मी वेगवेगळ्या पदार्थाचे रेसिपि बनवू शकते आणि लोकांपर्यंत मी पोहचू शकते.’
‘पेड्डी’ची अधिकृत रिलीज डेट जाहीर! ‘चिकिरी चिकिरी’ या गाण्याने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह
मास्टरशेफमध्ये सहभागी होण्याआधी अर्चना धोत्रे यांनी इच्छा व्यक्त केली होती की त्यांना एकना एक दिवस masterchef मध्ये प्रवेश करायचा आहे. याबद्दल सांगतानात्या म्हणाल्या, ‘माझं युट्युब वैगेरे सुरु असताना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना मी माझ्या मुलीसमोर ही इच्छा व्यक्त करायचे की मी पण एक दिवस मास्टरशेफमध्ये जाणार, माझी मुलगी तशी लहान आहे पण माझ्यासोबत बोलायला कोणी नाही म्हणून मी तिच्यासोबत बोलायचे आणि तिला सांगत राहायचे. आणि एक दिवस हा क्षण आला आणि माझं आयुष्य बदललं.’
अर्चना धोत्रे यांच्या कामाबद्दल सांगायचे झालं तर, त्या एक गृहिणी आहेत, त्यांना जेवण बनवायला खूप आवडते. तसेच त्यांनी अनेक मोठं मोठ्या सेलिब्रिटींच्या घरी शेफ म्हणून काम केलं आहे. मास्टरशेफमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांचं जीवन खूप बदललं आहे, आणि त्यांचे सोशल मीडियावर देखील लाखो चाहते आहेत.






