Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘कॅनडा होणार अमेरिकेचा भाग…’; ट्रम्प यांचा जस्टिन ट्रुडोंना सल्ला, नेमकं प्रकरण काय?

ट्रम्प यांनी कॅनडाच्या व्यापार धोरणांवर टीका करत, जर कॅनडाने अमेरिकेशी व्यापारातील तफावत दूर केली नाही, तर अमेरिकेचा भाग बनण्याचा विचार करावा, असे ट्रुडोंना सुचवले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 04, 2024 | 02:43 PM
'कॅनडा होणार अमेरिकेचा भाग...', ट्रम्प यांचा जस्टिन ट्रुडोंना सल्ला; नेमकं प्रकरण काय?

'कॅनडा होणार अमेरिकेचा भाग...', ट्रम्प यांचा जस्टिन ट्रुडोंना सल्ला; नेमकं प्रकरण काय?

Follow Us
Follow Us:

वॉश्गिंटन: अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन आठवड्यांपूर्वी एक मोठी घोषणा केली होती. ट्रम्प यांनी मेक्सिको, कॅनडा आणि चीन या तीन देशांवर कठोर शुल्क लावणार असल्याचे म्हटले होते. विशेष करुन कॅनडातून येणाऱ्या सर्व वस्तूंवर 25% शुल्क  लादला होता. त्यांनतर या विषयावरील वाद सोडवण्यासाठी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी फ्लोरिडामधील मार-ए-लागो येथे  ट्रम्प यांची भेट घेतली होती.

मात्र, यावेळी ट्रम्प यांनी कॅनडाच्या व्यापार धोरणांवर टीका करत, जर कॅनडाने अमेरिकेशी व्यापारातील तफावत दूर केली नाही, तर अमेरिकेचा भाग बनण्याचा विचार करावा, असा सल्ला ट्रुडोंना सुचवले. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाला अमेरिकेचा 51 वा राज्य होण्याचा सल्ला दिल्याने दोन्ही देशांमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. यावर ट्रुडो काय निर्णय घेतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

ट्रम्प यांचा प्रस्ताव

ट्रम्प यांनी कॅनडातून येणाऱ्या वस्तूंवर 25% टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. ट्रम्प यांनी कॅनडाला म्हटले होते की, कॅनडामुळे अमेरिकेला वार्षिक 100 बिलियन डॉलर्सचा तोटा होत आहे. तर, याला उत्तर देताना ट्रूडो यांनी हे टॅरिफ कॅनडाच्या अर्थव्यवस्थेसाठी घातक ठरेल, यामुळे कॅनडाची संपूर्ण अर्थव्यवस्था नष्ट होईल असे सांगितले. परंतु ट्रंप यांच्या वक्तव्यामुळे कॅनडातील लोकांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- तालिबानचा आणखी एक तानाशाही निर्णय; महिलांना नर्सिंगचे शिक्षण घेण्यापासून बंदी

फोटो सौजन्य: सोशल मीडिया

कॅनडाची भूमिका

कॅनडा हा अमेरिकेचा दुसऱ्या क्रमांकाचा व्यापार भागीदार आहे. कॅनडा अमेरिकेला मोठ्या प्रमाणात ऑटोमोबाईल्स, कृषी उत्पादनं आणि ऊर्जा निर्यात करतो. मात्र, ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे कॅनडाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कॅनडाच्या लोकांनी आणि नेत्यांनी नेहमीच स्वातंत्र्याला महत्व दिले आहे.यापूर्वी कॅनडाने अमेरिकेशी NAFTA (आता USMCA) सारख्या व्यापार नफ्याचे संरक्षण करण्यासाठी करार केले आहेत.

याशिवाय ट्रम्प यांनी कॅनडाच्या निर्वासित आणि स्थालांतरितांच्या उदारमतवादी धोरणावर देखील टिका केली आहे. यामुळे अमेरिकेची सीमा सुरक्षा धोक्यात येऊ शकते असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. तर कॅनडाने इमिग्रेशनला राष्ट्रीय ओळखीचा एक भाग मानत कायमच इमिग्रेशन आणि मानवी हक्कांसाठी कठोर भूमिका घेतली आहे. ट्रम्प यांचे हे विधान कॅनडाच्या सार्वभौमत्वावर हल्ला मानले जात आहे.

कॅनडा अमेरिकेचे 51 वां भाग बनण्याचा विचार करेल का? 

कॅनडा हा 1867 पासून स्वतंत्र राष्ट्र असून, त्याची राजकीय आणि सांस्कृतिक ओळख अमेरिकेपेक्षा वेगळी आहे. देशाची राजकीय प्रणाली, ब्रिटिश राजेशाहीप्रति निष्ठा, आणि स्वातंत्र्यपूर्ण धोरणे अमेरिकेपासून वेगळी आहेत. यामुळे कॅनडाच्या जनतेला ट्रम्प यांचा प्रस्ताव मान्य नाही.

कॅनडासाठी अमेरिकेचा 51 वा राज्य होण्याचा प्रस्ताव हा स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय अस्मितेच्या विरोधात आहे. दोन्ही देशांमध्ये व्यापारातील समस्या सोडवण्यासाठी सहकार्य गरजेचे असले तरीही, कॅनडाच्या सार्वभौमत्वाशी तडजोड करण्याचा कोणताही निर्णय कॅनडाच्या नागरिकांसाठी अमान्य आहे.

जागितक घडामोडी संबंधित बातम्या- ‘हिंदूंवरील अन्याय थांबायला हवा’…; ‘या’ भारतीय व्यक्तीने बांगलादेश सरकारला लिहिलं पत्र

Web Title: Trump suggestion trudeau canada should become 51 state of usa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2024 | 02:43 PM

Topics:  

  • America
  • Canada
  • Donald Trump
  • Justin Trudeau
  • world

संबंधित बातम्या

Shivali Parab: अमेरिकेत फिरतेय शिवाली परब; गुलाबी फ्रॉकमधील क्यूट लूक पाहून चाहते घायाळ!
1

Shivali Parab: अमेरिकेत फिरतेय शिवाली परब; गुलाबी फ्रॉकमधील क्यूट लूक पाहून चाहते घायाळ!

US Iran war : इराणचा अण्वस्त्र इशारा अन् अमेरिकेची मोठी लष्करी तयारी; होर्मुझच्या सामुद्रधुनीत महायुद्धाची ठिणगी?
2

US Iran war : इराणचा अण्वस्त्र इशारा अन् अमेरिकेची मोठी लष्करी तयारी; होर्मुझच्या सामुद्रधुनीत महायुद्धाची ठिणगी?

Brazil Election: ‘मीच ब्राझीलचा खरा नेता, निवडणुकीत हेराफेरी झाली’ अमेरिकेत पोहोचताच फ्लॅव्हिओ बोल्सोनारो यांचा खळबळजनक दावा
3

Brazil Election: ‘मीच ब्राझीलचा खरा नेता, निवडणुकीत हेराफेरी झाली’ अमेरिकेत पोहोचताच फ्लॅव्हिओ बोल्सोनारो यांचा खळबळजनक दावा

US Nuclear Lab : अमेरिकेच्या प्रमुख अणुप्रयोगशाळेत अचानक भीषण आग; आणीबाणी जाहीर, जाणून घ्या नक्की काय घडले?
4

US Nuclear Lab : अमेरिकेच्या प्रमुख अणुप्रयोगशाळेत अचानक भीषण आग; आणीबाणी जाहीर, जाणून घ्या नक्की काय घडले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.