नागपूर : ‘विद्यापीठे उघडण्यासाठी कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही, परंतु ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून विद्यापीठे काही वर्गांसाठी उघडली जातील. तथापि यापूर्वी, कॅम्पसमध्ये कोरोना रोखण्यासाठी गाइडलाइन तयार केल्या जातील.’असा तोडगा सध्या पुढे आला आहे.
कोरोनामुळे युनिव्हर्सिटी कॅम्पस किती काळ बंद राहणार? या प्रश्नाच्या उत्तरासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदचे (आयसीएमआर ) संचालक बलराम भार्गव, एम्सचे डॉ. रणदीप गुलेरिया, जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्य सदस्या सौम्या स्वामीनाथन यांच्यासह असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजचे अनेक तज्ज्ञ आणि कुलगुरूंसह कार्यशाळा घेऊन नियमावली तयार करण्याचे ठरविले आहे.
देशात केंद्रीय, राज्य, डीम्ड, खासगी अशी 986 विद्यापीठे असून, जवळपास 4 कोटी विद्यार्थी आहेत. सॅनिटाइजेशन, मास्किंग, सामाजिक अंतर हे विद्यापीठाच्या निकषांमध्ये समाविष्ट केले गेले आहेत, परंतु जेव्हा सर्व विद्यार्थी कॅम्पसमध्ये असतील तेव्हा खरे आव्हान राहणार असलयाने चिंता वाढली आहे. कॅम्पसमध्ये ऑक्सिजन प्लँट असावा, अशी सूचना पुढे आली असून, त्यासाठीचा खर्च कोणी करावा यावर एकमत झालेले नाही.






