आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता महाराष्ट्रातील व्यापारी आणि शेतकऱ्यांवरही होताना दिसत आहे. एपीएमसी मार्केटमधून मोठ्या प्रमाणात शेतीमाल कंटेनरद्वारे परदेशात निर्यात केला जातो. मात्र सध्याच्या परिस्थितीत निर्यातीसाठी पाठवलेले अनेक कंटेनर मार्गातच थांबले असून संबंधित ठिकाणी तो माल उतरवण्यास नकार देण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. काही ठिकाणी तो माल परत घेऊन जाण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.