मुंबई : भाजपा नेते व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची बोगस मजूरप्रकरणी मुंबई पोलिसांनी सोमवारी 3 तास चौकशी केली. स्वत:ला मजूर दाखवत मुंबै बँकेच्या संचालकपदी बेकायदा निवडून येत कोट्यवधीचा घोटाळा केल्याचा आरोप दरेकर यांच्यावर आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली होती. त्यानुसार सकाळी साडे अकरावाजेच्या सुमारास दरेकर माता रमाबाई आंबेडकर पोलिस ठाण्यात हजर झाले होते. दुपारी 3 वाजताच्या सुमारास त्यांची सुटका करण्यात आली(While the Mumbai Police was conducting an investigation, the investigating officers were receiving phone calls from someone; Praveen Darekar’s sensational claim).
यावेळी पोलिस ठाण्यासमोर भाजप कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. दरेकरांच्या समर्थनार्थ आमदार नितेश राणे, भाजपा नेते प्रसाद लाड आणि भाजपाचे कार्यकर्ते पोलिस ठाण्याच्या आवारात दाखल होते. यामुळे येथील वातावरण तणावपूर्णही झाले होते. चौकशीदरम्यान पोलिस उपनिरीक्षकांना सात वेळेस फोन आले. त्यानंतर ते अँटीचेंबरमध्ये जाऊन आले. चौकशीसाठी त्यांच्यावर दबाव होता, असा आरोपही दरेकर यांनी केला.
गरज भासल्यास चौकशीसाठी पुन्हा हजर राहीन. सरकारचा पोलिसांवर प्रचंड दबाव आहे. ते चौकशीदरम्यान प्रत्येक क्षणी दिसत होते. मुंबै बँकेशिवाय राज्यस्तरीय फेडरेशनविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. सरकारी कार्यालयातून हा गुन्हा दाखल कऱण्याच्या संदर्भात पुढील प्रक्रिया करण्यासंदर्भात सरकारचा दबाव असल्याचे प्रत्यक्ष जाणवत होते असा संशय दरेकरांनी व्यक्त केलाय.
मुंबई पोलिसांनी चौकशीदरम्यान कोणते प्रश्न विचारले? याबाबत दरेकर यांनी स्वतः माहिती दिली. जो गुन्हा झाला त्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. बँकेकडून काही लाभ घेतलाय का? असा प्रश्न विचारण्यात आला, असे दरेकर यांनी सांगितले. मुंबईच्या पोलिस आयुक्तांचा तपास अधिकाऱ्यांवर दबाव दिसत होता. त्यांना वारंवार फोन येत होते. पण, ते फोन कोणाचे होते माहिती नाही, असा संशयही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, दरेकर पोलिस ठाण्यात जाताच त्यांचा मोबाईल बंद झाला होता.ठाण्यात गेल्यावर मोबाईलची चार्जिंग संपल्याने तो चार्चिंगवर लावला होता. त्यामुळे तो बंद ठेवला होता. पोलिसांनी मोबाईल जप्त केला नव्हता, असे दरेकर यांनी स्पष्ट केले.
[blockquote content=”सरकारच्या दबावाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन ओळींच्या आरोपासाठी एवढी मोठी चौकशी कशासाठी? दरेकर यांना त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे परंतु कायद्याच्या राज्यात आम्ही कायद्यानेच उत्तर देऊ. वरून कोण फोन करीत आहे हे आम्हाला चांगलेच माहित आहे.” pic=”” name=”- प्रसाद लाड, आमदार, भाजपा”]
[read_also content=”घरात-दुकानात, वाहनांना ‘लिंबू-मिरची’च का बांधतात? अध्यात्म आणि विज्ञान काय सांगते? https://www.navarashtra.com/religion/religion/nimbu-mirchi-totka-nrvk-257586.html”]
[read_also content=”येथे लग्नानंतर नविन नवरा-नवरीच्या प्रायव्हेट पार्टची पूजा करतात; पूजेच्या नावावर होतात वधू-वरावर अत्याचार https://www.navarashtra.com/viral/here-after-the-wedding-the-newlyweds-worship-the-private-part-of-the-bride-the-bride-and-groom-are-tortured-in-the-name-of-worship-256616.html”]
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]