Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आगामी मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना-काॅंग्रेसमध्ये आतापासूनच चढाओढ; प्रफुल पटेल यांचे संजय राऊत आणि नाना पटोलेंवर टीकास्त्र

शिवसेना आणि काँग्रेसने (Shiv Sena and Congress) गेल्या काही दिवसांपासून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly elections) स्वबळ आणि आघाडीची भाषा करण्यास सुरुवात केली आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल (NCP leader Praful Patel) यांनी शिवसेना नेते संजय राऊत (Sena leader Sanjay Raut) आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांना फटकारले आहे.

  • By Navarashtra Staff
Updated On: Jun 19, 2021 | 05:51 PM
आगामी मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना-काॅंग्रेसमध्ये आतापासूनच चढाओढ; प्रफुल पटेल यांचे संजय राऊत आणि नाना पटोलेंवर टीकास्त्र
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर (Nagpur) .  शिवसेना आणि काँग्रेसने (Shiv Sena and Congress) गेल्या काही दिवसांपासून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly elections) स्वबळ आणि आघाडीची भाषा करण्यास सुरुवात केली आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल (NCP leader Praful Patel) यांनी शिवसेना नेते संजय राऊत (Sena leader Sanjay Raut) आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांना फटकारले आहे.

[read_also content=”वर्धा/ वर्ध्यात कोरोनाने हिरावले ३७६ बालकांचे छत्र, बालकल्याण विभागाच्या सर्वेक्षणात तथ्य आले समोर https://www.navarashtra.com/latest-news/in-wardha-corona-deprived-376-children-of-umbrellas-according-to-a-survey-conducted-by-the-child-welfare-department-nrat-144485.html”]

निवडणुकांना अजून अवकाश आहे. त्या अगोदरच काहीही भाष्य करण्यात शहाणपणा नाही, असा टोला लगावतानाच 2024मध्ये मुख्यमंत्री कुणाचा असेल याचा फॉर्म्युलाही प्रफुल्ल पटेल यांनी सांगितला आहे.

प्रफुल्ल पटेल यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला आहे. निवडणुकांना आणखी तीन वर्ष बाकी आहेत. त्या आगोदरच युती, आघाडी, स्वबळाची भाषा करणं शहाणपणा नाही, असा टोला पटेल यांनी राऊत आणि पटोले यांना लगावला आहे. ‘सामना’ वाचल्यावर काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील म्हणतात, निवडणुकांबाबतचा निर्णय 2003मध्ये होईल. त्यामुळे त्यावर आताच भाष्य करणं योग्य होणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

सध्या मुख्यमंत्रीपदासाठी जागा रिकामी नाही
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. त्यावरही पटेल यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतानाच मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युलाही सांगून टाकला. लोकशाहीत कुणालाही मुख्यमंत्री होता येतं. ज्या पक्षाचे आमदार जास्त असतील आणि ज्यांना लोकांचा पाठिंबा असेल तो मुख्यमंत्री होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

सध्या बहुमत महाविकास आघाडीकडे आहे आणि आमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. त्यामुळे आता जागा रिकामी नाही, असा चिमटाही त्यांनी पटोले यांना काढला. दरम्यान, पटेल यांनी मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला सांगून आगामी काळात मुख्यमंत्रीपदावर राष्ट्रवादीचाही दावा असणार असल्याचे संकेतच दिले आहेत. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

पंतप्रधानांना भेटण्यात गैर नाही
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले होते. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंद खोलीत चर्चा झाली होती. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. मुख्यमंत्री आणि देशाच्या पंतप्रधानांनी बोलणं यात काही गैर नाही, असं ते म्हणाले.

तिन्ही पक्षात समन्वय
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरही सध्या भाष्य करणं योग्य नसल्याचं ते म्हणाले. तसेच ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत तिन्ही पक्षात समन्वय आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. (praful patel reaction on alliance in 2024 assembly elections)

Web Title: Who will be the chief minister in 2024 praful patel said formula patole raut taught wisdom nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2021 | 05:51 PM

Topics:  

  • Nana patole
  • praful patel
  • Uddhav Thackeray
  • नाना पटोले
  • मुख्यमंत्री

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
1

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Uddhav Thackeray Pune PC:  महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान
2

Uddhav Thackeray Pune PC: महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

‘भारताला हिंदू पाकिस्तान बनवू पाहत आहेत…’ उद्धव ठाकरे शिवसेनेचा RSS वर गंभीर आरोप, नव्या वादाची ठिणगी
3

‘भारताला हिंदू पाकिस्तान बनवू पाहत आहेत…’ उद्धव ठाकरे शिवसेनेचा RSS वर गंभीर आरोप, नव्या वादाची ठिणगी

Ramdas Kadam: “उद्धवजींनी दोन दिवस शिवसेनाप्रमुखांच्या बॉडीचा…; रामदास कदम यांनी फोडला राजकीय बॉम्ब
4

Ramdas Kadam: “उद्धवजींनी दोन दिवस शिवसेनाप्रमुखांच्या बॉडीचा…; रामदास कदम यांनी फोडला राजकीय बॉम्ब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.