Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोहित आणि विराट दोघेही अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्याला अनुपस्थित; ‘हे’ दिग्गज क्रिकेटपटूही दिसले नाही; काय आहे नेमकं कारण

Anant-Radhika Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे सध्या भारतातील सर्वात मोठे चर्चेचे केंद्र आहेत. यात सहभागी होण्यासाठी जगभरातील सेलिब्रिटी भारतात पोहोचले होते. मात्र, भारतीय क्रिकेटमधील अनेक मोठी नावे लग्नाच्या कार्यक्रमात दिसली नाहीत. यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या नावाचाही समावेश आहे. जाणून घेऊया यामागचे नेमकं कारण....

  • By युवराज भगत
Updated On: Jul 15, 2024 | 02:50 PM
Rohit Sharma and Virat Kohli

Rohit Sharma and Virat Kohli

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींचा धाकटा मुलगा अनंत अंबानी हा शुक्रवारी, १२ जुलै रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये देदीप्यमान सोहळा समारंभात बालपणीची मैत्रीण राधिका मर्चंटशी विवाहबंधनात अडकला. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाचे कार्यक्रम सुरू आहेत. त्यात देशातील आणि जगातील जवळपास सर्वच मोठी नावे दिसत आहेत. भारतीय क्रिकेट संघाचे जवळपास सर्व खेळाडूही लग्नात दिसले होते. मात्र, विराट कोहली आणि रोहित शर्मासह अनेक नावे लग्नात दिसली नाहीत.

रोहित आणि विराट का होते अनुपस्थित

रोहित शर्मा अनंत आणि राधिकाच्या संगीत सोहळ्यात सहभागी झाला होता पण लग्नाला तो उपस्थित नव्हता. रोहित त्याच दिवशी विम्बल्डनच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दिसला होता. यानंतर रोहित अमेरिकेला गेला, जिथे त्याने त्याच्या अकादमीच्या कार्यक्रमात भाग घेतला. टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर मुंबईतील जल्लोषानंतरच विराट कोहली लंडनला रवाना झाला होता. पत्नी अनुष्कासोबत विराटची दोन मुलेही तिथे आहेत. तिथे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसोबत आनंद घेत आहे.

‘हे’ दिग्गज खेळाडूही दिसले नाहीत
अनंत आणि राधिकाच्या लग्नात रोहित शर्मा आणि विराट कोहलीशिवाय इतर अनेक मोठे भारतीय खेळाडू दिसले नाहीत. यामध्ये भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली, टीम इंडियाला टी-20 वर्ल्ड चॅम्पियन बनवणारा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, युवराज सिंग आणि हरभजन सिंगदेखील येथे दिसले नाहीत. हरभजनने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्वही केले आहे. युवी आणि भज्जी इंग्लंडमध्ये वर्ल्ड लिजेंड्स चॅम्पियनशिपमध्ये सहभागी झाले होते. हा सामना बर्मिघम येथे सुरु होता, हा सामना युवीच्या नेतृत्वात भारताने जिंकला, त्यामुळे हे दिग्गज खेळाडून बर्मिंघमलाच अडलेले असलेले पाहायला मिळाले. ही ट्रॉफी आपल्या खेळाडूंनी जिंकल्याने अनेक खेळाडू आनंदात दिसत होते.

विराट-रोहित कधी दिसणार मैदानावर?
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. भारतीय संघाला पुढील मालिका श्रीलंकेत खेळायची आहे. तीन टी-२० आणि तितकेच एकदिवसीय सामने होतील. रोहित आणि विराट या दौऱ्यातही विश्रांती घेणार आहेत. यानंतर सप्टेंबरमध्ये भारताची बांगलादेशसोबत कसोटी मालिका आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही या मालिकेत खेळताना दिसणार आहेत.

Web Title: Why did rohit sharma and virat kohli not attend anant radhikas wedding ceremony these big cricketers were also missing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2024 | 02:49 PM

Topics:  

  • Anant Radhika Wedding
  • Rahul Dravid
  • Rohit Sharma
  • Virat Kohli
  • yuvraj singh

संबंधित बातम्या

विराट कोहलीप्रमाणेच शुभमन गिललाही त्याच्या VHT सामन्यात असणार सुरक्षा, BCCI ने ‘खाजगी बाउन्सर’ची केली व्यवस्था
1

विराट कोहलीप्रमाणेच शुभमन गिललाही त्याच्या VHT सामन्यात असणार सुरक्षा, BCCI ने ‘खाजगी बाउन्सर’ची केली व्यवस्था

IND vs NZ : सचिन तेंडुलकरचा ‘विश्वविक्रम’ धोक्यात! 2026 मध्ये विराट कोहली करणार ‘महापक्रम’; वाचा सविस्तर 
2

IND vs NZ : सचिन तेंडुलकरचा ‘विश्वविक्रम’ धोक्यात! 2026 मध्ये विराट कोहली करणार ‘महापक्रम’; वाचा सविस्तर 

IND vs NZ ODI Series : ‘हिटमॅन’ला खुणावतोय ‘हा’ विक्रम! रोहित शर्माला गांगुली, अझरुद्दीनसह सेहवागला मागे टाकण्याची संधी 
3

IND vs NZ ODI Series : ‘हिटमॅन’ला खुणावतोय ‘हा’ विक्रम! रोहित शर्माला गांगुली, अझरुद्दीनसह सेहवागला मागे टाकण्याची संधी 

IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी  कसा असेल भारतीय संघ? आकाश चोप्राने केला दावा; या गोलंदाजाचे होणार पुनरागमन
4

IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी कसा असेल भारतीय संघ? आकाश चोप्राने केला दावा; या गोलंदाजाचे होणार पुनरागमन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.