Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विराटला पुन्हा मिळणार RCBचं साम्राज्य? चाहत्यांना मिळणार ‘ही’ मोठी बातमी

आरसीबीच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. विराट कोहलीला पुन्हा आरसीबीचे कर्णधारपद मिळू शकते, फ्रँचायझीने अद्याप राजीनामा स्विकारलेला नाही.

  • By Payal Hargode
Updated On: Mar 11, 2022 | 10:42 AM
विराटला पुन्हा मिळणार RCBचं साम्राज्य? चाहत्यांना मिळणार ‘ही’ मोठी बातमी
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा आयपीएल इतिहासातील असा संघ आहे ज्याने आजपर्यंत आयपीएलचे विजेतेपद पटकावलेले नाही, मात्र हा संघ नेहमीच चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतो. फॅन फॉलोइंगच्या बाबतीत आरसीबीचा संघ आघाडीवर आहे. आयपीएल २०२२, २६ मार्चपासून सुरू होणार आहे परंतु रॉयल चॅलेंजर्स बंगलोर हा एकमेव संघ आहे ज्याने अद्याप आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा केलेली नाही.

IPL २०२१ च्या उत्तरार्धापूर्वी विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याची पुष्टी केली असली तरी RCB ने अद्याप विराट कोहलीचा राजीनामा स्वीकारलेला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुन्हा एकदा विराट कोहलीकडे आरसीबीचे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते. वास्तविक, विराट कोहलीला पुन्हा कर्णधार बनवण्याची चर्चा जोर धरू लागली आहे कारण आरसीबीने ना राजीनामा स्वीकारला आहे ना कर्णधाराच्या नावाची घोषणा केली आहे. विराट कोहलीला आरसीबीने १५ कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले होते.

विराटने ‘द आरसीबी पॉडकास्ट’ मध्ये कर्णधारपद सोडण्याबाबत आयपीएलचा १५वा सीझन सुरू होण्याच्या एक महिना आधी सांगितले होते. विराट म्हणाला, ‘मी अशा प्रकारचा माणूस नाही जो काहीतरी धरून बसतो. जेव्हा मला असे वाटते की मी एखाद्या गोष्टीचा आनंद घेऊ शकत नाही, तेव्हा मी स्वतःला त्यापासून वेगळे करतो.

मी ते काम करू शकत नाही. गेल्या वर्षी कोहलीने चाहत्यांना अनेक धक्के दिले. आधी टीम इंडियाचे टी-२० चे कर्णधारपद सोडले आणि नंतर RCB ची कमान सोडली. नंतर विराटला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले आणि त्यानंतर विराटने कसोटीच्या कर्णधारपदाचाही राजीनामा दिला.

आयपीएलच्या इतिहासातील विराट कोहली हा एकमेव खेळाडू आहे जो अजूनही आयपीएलमध्ये एकाच संघाकडून खेळत आहे. विराट २००८ पासून आरसीबीचा भाग आहे. विराटने स्वतः एकदा सांगितले होते की जोपर्यंत विराट आयपीएलमध्ये खेळतो तोपर्यंत तो आरसीबीचा भाग राहील. विराट कोहलीने आतापर्यंत आयपीएलमध्ये आरसीबीकडून २०७ सामने खेळले आहेत. विराटच्या नावावर ३७.३९ च्या सरासरीने ६२८३ धावा आहेत. विराटने आयपीएलमध्ये ५ शतके आणि ४२ अर्धशतकेही केली आहेत.

Web Title: Will virat get rcbs kingdom again this is big news for fans

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2022 | 10:40 AM

Topics:  

  • IPL Updates
  • Royal Challengers Bangalore
  • Sports News
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

महाराष्ट्राच्या ‘महा-देवा’ फुटबॉल उपक्रमाला बळ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टायगर श्रॉफसोबत सामंजस्य करार
1

महाराष्ट्राच्या ‘महा-देवा’ फुटबॉल उपक्रमाला बळ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टायगर श्रॉफसोबत सामंजस्य करार

WPL 2026: ‘या’ तारखेपासून महिला प्रीमियर लीग सुरू होण्याची शक्यता; केवळ मुंबई आणि बडोदा येथे सामने होणार!
2

WPL 2026: ‘या’ तारखेपासून महिला प्रीमियर लीग सुरू होण्याची शक्यता; केवळ मुंबई आणि बडोदा येथे सामने होणार!

IPL 2026 च्या लिलावापूर्वी आरसीबी नव्या वादात अडकणार, विराट कोहलीलाही द्यावे लागणार उत्तर
3

IPL 2026 च्या लिलावापूर्वी आरसीबी नव्या वादात अडकणार, विराट कोहलीलाही द्यावे लागणार उत्तर

IND vs SA 1st Test: शुभमन गिलच्या रडारवर ‘विराट’ कामगिरी! ९३ वर्षांनंतर ‘हा’ कारनामा करणारा ठरेल पहिला भारतीय कर्णधार
4

IND vs SA 1st Test: शुभमन गिलच्या रडारवर ‘विराट’ कामगिरी! ९३ वर्षांनंतर ‘हा’ कारनामा करणारा ठरेल पहिला भारतीय कर्णधार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.