
भारत अन् इंग्लंडमध्ये उद्यापासून एकदिवसीय मालिकेचा थरार सुरू होणार आहे. या आगामी सामन्यात विराट केवळ मैदानावर उतरणार नाही, तर दोन अत्यंत ऐतिहासिक महा-विक्रमांना गवसणी घालण्याच्या उंबरठ्यावर असणार आहे. त्यामध्ये क्रिकेटच्या देवाचा रेकॉर्ड मोडण्याची संधी त्याच्याकडे असेल. सर्वात प्रथम विराट कोहली उद्या आपला 300 वा वनडे सामने खेळणार आहे. त्याने आतापर्यंत 311 सामने खेळले असून 299 डावात फलंदाजी केली आहे. उद्याच्या सामन्यात खेळायला येताच ही त्याची ३०० वी वनडे इनिंग ठरणार आहे.
तसेच या सिरिजमध्ये सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडण्याची संधी विराटकडे असणार आहे. विराट कोहलीने 311 सामन्यांमध्ये 14,797 रन्स केल्या आहेत. त्याला वनडे क्रिकेटमध्ये 15 हजार रन्स पूर्ण करण्यासाठी केवळ 203 रन्सची आवश्यकता असणार आहे. या सिरिजमध्ये विराट कोहलीने 203 रन्स केल्या तर तो सर्वात वेगवान १५,००० एकदिवसीय धावा करणारा जगातील पहिला फलंदाज असणार आहे. याद्वारे तो क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढू शकतो. सचिन तेंडुलकरने 356 इनिंगमध्ये 15 हजार रन्स पूर्ण केल्या होत्या. विराट कोहली बऱ्याच महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसणार आहे.
विराट कोहली आतापर्यंत भारतीय संघासाठी 311 वनडे सामने खेळला आहे. त्यामध्ये 299 सामन्यांमध्ये तो फलंदाजीसाठी मैदानात आला आहे. उद्याचा सामना त्याचा 300 वा सामना फलंदाज म्हणून असणार आहे. भारतीय क्रिकेटमध्ये काहीच खेळाडू 300 किंवा त्यापेक्षा जास्त सामने खेळले आहेत. सौरव गांगुलीने 300 वनडे खेळून झाल्यावर निवृत्ती घेतली होती. आता उद्याच्या सामन्यात विराट कोहली गांगुलीच्या रेकॉर्डची बरोबरी करणार आहे. सौरव गांगुलीने 311 वनडे खेळून 300 सामन्यांमध्ये फलंदाजी केली आहे.