Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

औद्योगिक क्रीडा स्पर्धेत ‘टाटा मोटर्स’चा दबदबा! विजेतेपदावर कोरलं नाव, बजाज ऑटो उपविजेता

 सत्काराला उत्तर देताना अनुपकुमार म्हणाले की "खेळाचा छंद माणसाला मानसिक तणावातून मुक्त करतो व ऊर्जा वाढते;यामुळे माणसाने नित्यनियमाने खेळ खेळलाच पाहिजे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 13, 2026 | 07:35 PM
औद्योगिक क्रीडा स्पर्धेत ‘टाटा मोटर्स’चा दबदबा! विजेतेपदावर कोरलं नाव, बजाज ऑटो उपविजेता
Follow Us
Follow Us:
  • औद्योगिक क्रीडा संघटनेची सर्वसाधारण सभा व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ
  • टाटा मोटर्सने ३१ गुण मिळवून जिंकले विजेतेपद
  • बजाज ऑटो आकुर्डी संघाने मिळवले उपविजेतेपद 
पुणे: औद्योगिक क्रीडा संघटनेची सर्वसाधारण सभा शुक्रवार,दिनांक ११ जुलै २०२६ रोजी “कपिला बिझनेस हॉटेल” ढोले पाटील रोड पुणे -१ येथे सायंकाळी ७.३० वाजता संपन्न झाली. या सभेला पिंपरी-चिंचवड,चाकण,तळेगाव,पुणे येथील कामगार क्षेत्रातील विविध कंपन्यांचे खेळाडू,प्रतिनिधी व क्रीडा क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.

या पारितोषक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन दत्ता शेळके,प्रास्ताविक, मागील वर्षाचा आढावा व आर्थिक अहवाल वाचन प्रदीप वाघ यांनी केले. प्रमुख पाहुणे अनुपकुमार (ॲडिशनल जनरल मॅनेजर ॲम्युनेशन फॅक्टरी) यांचा सत्कार संघटनेचे अध्यक्ष गोल्फ खेळाडू राजेंद्र नागेशकर,उपाध्यक्ष नरेंद्र कदम,सचिव वसंत ठोंबरे यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन केले.

२०२५–२६ वर्षाच्या स्पर्धांमध्ये टाटा मोटर्सने ३१ गुण मिळवून सर्वसाधारण विजेतेपद तर बजाज ऑटो आकुर्डी संघाने २७ गुण मिळवून उपविजेतेपद पटकावले.टाटा मोटर्स कडून टाटा मोटर्स स्पोर्ट्स कमिटीचे अध्यक्ष शशिकांत कात्रे व टाटा मोटर्सचे एचआर व स्पोर्ट्स मॅनेजर नितीन कदम यांनी तर बजाज ऑटोकडून बजाज ऑटोचे एचआर व स्पोर्ट्स मॅनेजर अतुल काळोखे यांनी अनुपकुमार, राजेंद्र नागेशकर व वसंत ठोंबरे यांच्याकडून उपविजेतेपदाचा करंडक स्वीकारला.याच प्रसंगी संस्थेचे २०२६–२७चे क्रीडा वेळापत्रक जाहीर करण्यात आले.

राडा होणार पण BCCI नाही ऐकणार! Team India मध्ये येण्यासाठी Suryakumar Yadav ला करावे लागेल ‘हे’ काम

सत्काराला उत्तर देताना अनुपकुमार म्हणाले की “खेळाचा छंद माणसाला मानसिक तणावातून मुक्त करतो व ऊर्जा वाढते;यामुळे माणसाने नित्यनियमाने खेळ खेळलाच पाहिजे. ६२ वर्षाची औद्योगिक क्रीडा संघटना कामगार क्षेत्रातील खेळाडूंना क्रीडा नैपुण्य दाखवण्याची संधी मिळवून देते याचा मला खूप आनंद होतो. तर संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नागेशकर म्हणाले की २०२५–२६ मध्ये संघटनेच्या स्पर्धांमध्ये जवळजवळ २५० कंपन्यांनी,२५०० च्यावर खेळाडूंनी १४ स्पर्धामधून आपला सहभाग नोंदवला. औद्योगिक क्रीडा संघटनेने क्रीडा क्षेत्राची अधिकाधिक व्याप्ती वाढवावी व अधिकाधिक महिला खेळाडूंना या मध्ये सहभागी करून घ्यावे.यावर्षी “महिला क्रिकेट व पासिंग व्हॉलीबॉल” या खेळाची प्रथम सुरुवात करण्यात आली ही उल्लेखनीय बाब आहे.

वाद पेटवला पण Suryakumar Yadav च्या ‘त्या’ पोस्टने सगळे चित्र स्पष्ट; म्हणाला, ‘मला भारतीय…’

याप्रसंगी स्पर्धेत प्रायोजकत्व देणाऱ्या १२ कंपन्यांना(सँडविक एशिया,टाटा मोटर्स,बजाज ऑटो आकुर्डी,फॉरविया  फॉरेशिया,एसकेएफ,प्राज इंडस्ट्रीज,ॲटलास कॉपको,अल्ट्रा कार्पोटेक,महेंद्रा अँड महिंद्रा,फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स,एमक्यूअर फार्मासिटिकल्स, जेसीबी,  टेट्रापॅक, ॲम्युनेशन फॅक्टरी,टाटा टेक्नॉलॉजी,सिग्मा इलेक्ट्रिकल) नरेंद्र कदम,विजय हिंगे,हरी देशपांडे,अतुल काळोखे,गिरीश गायकवाड,दुष्यंत गायकवाड, दयानंद प्रक्षाले,सचिन कांबळे,मंदार कुलकर्णी,दत्ता पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय हिंगे,हरी देशपांडे,प्रदीप वाघ,दुष्यंत गायकवाड,संतोष शिंदे,अशोक त्यागी,दयानंद प्रक्षाले,अतुल काळोखे,सचिन कांबळे,गिरीश गायकवाड,मंदार कुलकर्णी,अनिकेत आवटे,राहुल चावरिया,कृष्णा कोले , मिनीनो कार्डोझ,वल्लभ मेंगाळे यांचे मोलाचे साह्य लाभले.कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन वसंत ठोंबरे यांनी केले.

Web Title: General body meeting and annual prize distribution ceremony of the industrial sports association tata and bajaj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 07:35 PM

Topics:  

  • pune news
  • Sports News

संबंधित बातम्या

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजपमध्ये चुरस? आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
1

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजपमध्ये चुरस? आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

राज ठाकरेंवर रील केली अन् महेश मोटेला ‘मनसे’वाल्यांनी काळं फासलं; डोक्यावर चप्पल ठेवून उठाबशा, VIDEO व्हायरल
2

राज ठाकरेंवर रील केली अन् महेश मोटेला ‘मनसे’वाल्यांनी काळं फासलं; डोक्यावर चप्पल ठेवून उठाबशा, VIDEO व्हायरल

शालेय खेळाडू मैदानात घालणार धुमाकूळ! PCMC मध्ये Basketball स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन
3

शालेय खेळाडू मैदानात घालणार धुमाकूळ! PCMC मध्ये Basketball स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन

Asian Games 2026: कोण आहे Suchika Tariyal? 700 ग्रॅमने हुकलं फायनल पण इतिहास रचला; भारताला MMA मध्ये पहिलं ऐतिहासिक पदक
4

Asian Games 2026: कोण आहे Suchika Tariyal? 700 ग्रॅमने हुकलं फायनल पण इतिहास रचला; भारताला MMA मध्ये पहिलं ऐतिहासिक पदक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.