पोलिसांनी एफआयआर दाखल केल्यानंतर या प्रकरणी बृजभूषण यांनी प्रतिक्रीय दिली आहे. मी राजीनामा देणार नाही. राजीनामा देणे म्हणजे माझ्यावर झालेले आरोप मी मान्य केले आहेत. माझा कार्यकाळ जवळपास संपत आला आहे. राजीनामा ही मोठी गोष्ट नाही. मात्र मी गुन्हेगार म्हणून राजीनामा देणार नाही. तसेच, ‘दिल्ली पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. या आरोपांना सामोरे जाण्यासाठी मी पूर्णपणे तयार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश माझ्यासाठी सार्वत्रिक आहे. माझा तपास यंत्रणेवर पूर्ण विश्वास आहे. अनेक महिन्यांपासून आरोप-प्रत्यारोप होत आहेत, त्याचा मलाही त्रास होतो. मला आशा आहे की एजन्सी निष्पक्ष तपास करेल आणि लवकरच तपास करेल. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. असं ते म्हणाले.