Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘क्षयरोगमुक्त भारत’ साठी १०० दिवसांचा उपक्रम सुरू! कमकुवत रोगप्रतिकारकशक्ती असल्यास वाढू शकतो क्षयरोगचा धोका

'क्षयरोगमुक्त भारत अभियान' हा १०० दिवसांचा उपक्रम यशस्वीरित्या सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाद्वारे भारताला क्षयरोगापासून मुक्त करण्याचे करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 28, 2026 | 09:05 AM
'क्षयरोगमुक्त भारत' साठी १०० दिवसांचा उपक्रम सुरू! कमकुवत रोगप्रतिकारकशक्ती असल्यास वाढू शकतो क्षयरोगचा धोका

'क्षयरोगमुक्त भारत' साठी १०० दिवसांचा उपक्रम सुरू! कमकुवत रोगप्रतिकारकशक्ती असल्यास वाढू शकतो क्षयरोगचा धोका

Follow Us
Follow Us:

मुंबई येथील ‘राजा रामदेव आनंदीलाल पोदार केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थे’मध्ये, संस्थेचे प्रभारी अधिकारी डॉ. विपिन कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली, ‘क्षयरोगमुक्त भारत अभियान’ हा १०० दिवसांचा उपक्रम यशस्वीरित्या सुरू करण्यात आला. हा उपक्रम भारताला क्षयरोगापासून मुक्त करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. याप्रसंगी, २५ एप्रिल २०२६ रोजी, सर्व अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका वर्ग आणि कर्मचारी यांनी ‘निक्षय प्रतिज्ञा’ घेऊन क्षयरोग निर्मूलनाप्रती आपली कटिबद्धता व्यक्त केली. या प्रतिज्ञेच्या माध्यमातून सामूहिक जबाबदारी, जागृती आणि सक्रिय सहभाग यांचा संदेश देण्यात आला.(फोटो सौजन्य – istock)

उन्हाळ्यात खूप जास्त थकवा येतो? नियमित खा ‘या’ पौष्टिक पदार्थांपासून बनवलेला चविष्ट लाडू, हाडे होतील मजबूत

कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असल्यास क्षयरोग

आपल्या भाषणात, डॉ. विपिन कुमार शर्मा यांनी क्षयरोगाचा प्रसार, प्रतिबंध आणि जोखीम घटक यांविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, जेव्हा एखादी बाधित व्यक्ती खोकते किंवा शिंकते. तेव्हा प्रामुख्याने हवेद्वारे क्षयरोगाचा प्रसार होतो.क्षयरोगाचा प्रतिबंध करण्यासाठी त्यांनी लवकर निदान, नियमित उपचार, संतुलित आहार आणि स्वच्छता याना मुख्य उपाय म्हणून अधोरेखित केले. शिवाय, मधुमेह, कुपोषण किंवा कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींना क्षयरोग होण्याची शक्यता अधिक असते, असेही त्यांनी नमूद केले.

प्रभावी उपचार आणि जनसहभागाला चालना

१०० दिवसांच्या या अभियानांतर्गत प्रस्तावित उपक्रमांची रूपरेषा मांडताना, डॉ. शर्मा यांनी सांगितले की, हा कार्यक्रम आयुष मंत्रालय आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वाच्या अनुषंगाने राबवला जात आहे.या उपक्रमांचा मुख्य उद्देश म्हणजे क्षयरोगाविरुद्धच्या लढचात लवकर निदान, प्रभावी उपचार आणि जनसहभागाला चालना देणे हा आहे.

उपक्रमांमध्ये खालील बाबींचा समावेश आहे:

‘आयुष्मान आरोग्य शिबिरांचे’ (तपासणी शिबिरांचे) आयोजन, क्षयरोगाशी संबंधित जागृती आणि माहिती, शिक्षण व संवाद उपक्रम, ‘निक्षय मित्रांची’ (क्षयरोग सहाय्यक स्वयंसेवक) नोंदणी आणि सक्रिय सहभाग, क्षयरोगाच्या उपचारामध्ये आयुष आधारित आरोग्य पद्धतींचा समावेश करणे,इत्यादी बाबींचा समावेश आहे.

Travel News : ताऱ्यांच जग पाहण्याची संधी, महाराष्ट्रात खुले झालेत नवे टुरिस्ट स्पॉट

‘क्षयरोग हरेल, राष्ट्र जिंकेल ‘चा दिला संदेश

या प्रसंगी संस्थेच्या भूमिकेवर प्रकाश टाकताना असे नमूद करण्यात आले की, मुंबई येथील ‘राजा रामदेव आनंदीलाल पोदार केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्था’ ही जागृती कार्यक्रम, समुदाय संपर्क मोहीम, तपासणी उपक्रम आणि आयुष पद्धतींचा समावेश यांद्वारे या अभियानाला भक्कम पाठिंबा देईल. क्षयरोग निर्मूलनाच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांना गती देण्याच्या उद्देशाने, ही १००-दिवसीय मोहीम २४ एप्रिल २०२६ ते ३० जून २०२६ या कालावधीत राबविली जात आहे. क्षयरोग हरेल, राष्ट्र जिंकेल’ या संदेशासह या कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी सर्वांना एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आले.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: 100 days campaign for tb free india started having a weak immune system can increase the risk of tuberculosis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 09:05 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • health issue
  • TB

संबंधित बातम्या

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी
1

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी

Health Update: शस्त्रक्रियेत मज्जातंतूंवर नजर; इजा होताच इशारा! पालिका रुग्णालयांत अत्याधुनिक ‘नर्व्ह मॉनिटरिंग’ प्रणाली
2

Health Update: शस्त्रक्रियेत मज्जातंतूंवर नजर; इजा होताच इशारा! पालिका रुग्णालयांत अत्याधुनिक ‘नर्व्ह मॉनिटरिंग’ प्रणाली

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ
3

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ

Health Update: Ovarian Cyst म्हणजे कॅन्सर नाही? रजोनिवृत्तीपूर्वी अंडाशयातील गाठींबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती
4

Health Update: Ovarian Cyst म्हणजे कॅन्सर नाही? रजोनिवृत्तीपूर्वी अंडाशयातील गाठींबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.