उन्हाळ्यात खूप जास्त थकवा येतो? नियमित खा 'या' पौष्टिक पदार्थांपासून बनवलेला चविष्ट लाडू, हाडे होतील मजबूत
उन्हाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी?
मुगाचे लाडू बनवण्याची कृती आणि फायदे?
थकवा दूर करण्यासाठी काय खावे?
राज्यासह संपूर्ण देशभरात उष्णतेची लाट आली आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येत आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे शरीरसंबंधित संसर्गजन्य आजारांची लागण होत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. कडक उन्हात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर अंगाची काहिली होते. तसेच सतत येणाऱ्या घामामुळे शरीरातील पाणी आणि आवश्यक क्षारांची पातळी बाहेर पडून जाते. यामुळे शरीरात खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. घामाच्या दुर्गंधीमुळे आणि खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणाऱ्या बदलांमुळे शरीरातील ऊर्जा कमी होऊन जाते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीर लगेच थकून जाते. ज्यामुळे थकवा, अशक्तपणा वाढण्यासोबतच गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते. शरीरात वाढलेल्या थकव्यामुळे खूप जास्त अशक्तपणा येतो. त्यामुळे दैनंदिन आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात वाढलेला थकवा दूर करण्यासाठी कोणत्या पदार्थाचे सेवन करावे, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घामावाटे शरीरातील पाणी बाहेर पडून जाते. ज्याच्या परिणामामुळे खूप जास्त थकवा येतो. सकाळी उठल्यानंतर शरीरात थकवा, अशक्तपणा वाढल्यास संपूर्ण दिवस कंटाळवाणा जातो. त्यामुळे उठल्यानंतर नाश्त्यात वेगवेगळ्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. नाश्त्यात मुगाच्या लाडूचा समावेश करावा. मूग शरीरासाठी खूप जास्त पौष्टिक आहेत. पारंपरिक पद्धतीने हिरव्या मुगांपासून बनवलेला लाडू चवीला अतिशय सुंदर लागतात. शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी आणि पोषक घटकांची कमतरता दूर करण्यासाठी हिरव्या मुगाचा लाडू खावा. यामुळे थकवा कमी होण्यासोबतच हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
लाडू बनवण्यासाठी हिरवे मूग भाजून व्यवस्थित लालसर करून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात बारीक पावडर करून घ्या. तयार केलेल्या मिश्रणात गूळ, सुका मेवा आणि तूप घालून व्यवस्थित मिक्स करा आणि तुम्हाला हवे त्या आकारात लाडू बनवून घ्या. पारंपरिक पद्धतीने तयार केलेले लाडू केवळ चवीलाच नाहीतर शरीरासाठी सुद्धा खूप जास्त पौष्टिक आहेत. मूग भाजल्यामुळे लाडू दीर्घकाळ व्यवस्थित टिकून राहतात. शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी आणि थकवा दूर करण्यासाठी नियमित पौष्टिक लाडूचा आहारात समावेश करावा. हे लाडू तुम्ही स्नॅक्स म्हणून सुद्धा खाऊ शकता.
मुगाची डाळ किंवा हिरवे मूग शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर मानले जातात. यामध्ये प्रोटीन्स, फायबर्स आणि इतर पोषक तत्व आढळून येतात, ज्यामुळे शरीर आतून मजबूत होण्यास मदत होते. वाढत्या उन्हाळ्यात पोटासाठी मुगाचे लाडू खूप जास्त फायदेशीर मानले जातात. याशिवाय लाडू बनवताना त्यात सुका मेवा घातल्यामुळे शरीराला खूप जास्त पोषण मिळते. शरीरात वाढलेली कमजोरी आणि थकवा दूर करण्यासाठी लाडूचा आहारात समावेश करावा. नियमित एक लाडू खाणे शरीरासाठी पुरेसे आहे. त्यापेक्षा जास्त लाडूचे सेवन केल्यास शरीरात उष्णता वाढू शकते.
Ans: उष्णतेमुळे शरीरातील पाण्याची कमतरता, घाम जास्त येणे, इलेक्ट्रोलाइट्स कमी होणे आणि अपुरा आहार यामुळे थकवा जाणवतो.
Ans: तिळ, ड्रायफ्रूट्स आणि गुळामध्ये कॅल्शियम, आयर्न आणि इतर पोषक घटक असतात, जे हाडे मजबूत करण्यास मदत करतात.
Ans: भरपूर पाणी प्या, हलका व संतुलित आहार घ्या, उन्हात कमी वेळ राहा आणि पुरेशी झोप घ्या.






