
Travel News : देशातील एक असे ठिकाण जिथे आहेत 99,99,999 मुर्त्या, फार रंजक याचे याची कहाणी
एक करोडहून फक्त एक मूर्ती कमी?
जेव्हाही उनाकोटीबद्दल चर्चा होते तेव्हा सर्वात आधी येथील मूर्त्यांच्या संख्यांची चर्चा होते. मान्यता आहे की, इथे एकूण ९९ लाख ९९ हजार आणि ९९ देवी-देवीतांच्या मूर्त्या आढळल्या जातात. तथापि, इतक्या मोठ्या संख्येने मूर्ती मोजणे शक्य नाही. ही संख्या प्रामुख्याने स्थानिक मान्यता आणि प्रचलित कथांशी जोडलेली आहे. पण आता प्रश्न असा पडतो की, उनाकोटीमध्ये इतक्या मूर्त्या बनवल्या कुणी? आणि ही संख्या एक करोडहून फक्त एक कमी का? चला या प्रश्नांचे उत्तर जाणून घेऊया.
पर्वतातच आहेत विशाल मूर्त्या
त्रिपुराच्या उनाकोटीमध्ये एक प्राचीन शिव तीर्थस्थळ आहे. इथे पर्वतांना आणि मोठमोठ्या खडकांना कापून देवी-देवतांच्या मूर्त्या तयार करण्यात आल्या आहेत. मानलं जातं की, खडकांपासून तयार केलेले हे शिल्प ७ व्या ते ९ व्या शतकादरम्यान तयार करण्यात आले. हा संपूर्ण परिसर १५० एकर जमिनीवर पसरलेला आहे. चारही बाजूला हिरवळ, घनदाट जंगल आणि उंच पर्वत इथे पाहायला मिळतात. हेच दृष्य उनाकोटीला इतर धार्मिक स्थळांहून वेगळे बनवते.
एक करोड देव एकेरात्री जेव्हा झोपले होते…
उनाकोटीशी जोडलेली एक लोकप्रिय कहाणी भगवान शिवाशी संबंधित आहे. धार्मिक मान्यतेनुसार, एकेदिवशी भगवान शिव एक करोड देवी-देवतांसोबत काशीला जात होते. यावेळी रस्त्यातच रात्र झाल्याने सर्वांनी पर्वतावर राहण्याचा निश्चय बनवला. मान्यता आहे की, त्याकाळी या ठिकाणाला रघुनंदन पर्वत या नावाने ओळखले जात होते. महादेवाने सर्व देवी-देवीतांना सकाळच्या प्रहरीच काशीला प्रस्थान करणार असल्याचे सांगितले. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी भगवान शिव सोडून एकही देव वेळेवर जागे झाले नाही. सांगितले जाते की, यावर शंकर नाराज झाले आणि त्यांनी एकट्याने काशीला प्रस्थान करण्याचा निर्णय घेतला. यानंतर जे देवदेवता झोपलेले राहिले, त्यांचे तिथेच दगडी मूर्तीमध्ये रुपांतर झाले. ही कथा उनाकोटीतील दगडी मूर्त्यांशी जोडली जाते.
दुसरी कथा
उनाकोटी संबंधित आणखी एक कथा फार प्रचलित आहे. ही कथा भगवान विश्वकर्मा यांचा मुलगा कल्लू कुमार याच्या संबंधित आहे. स्थानिक मान्यतानुसार, कल्लू कुमार यांना भगवान शिव आणि पार्वतीसोबत कैलशात जायचे होते. परंतु भगवान शिव यासाठी तयार नव्हते. यानंतर कल्लू कुमार याच्यासमोर एक अट ठेवण्यात आली. सांगितले गेले की, जर त्याने एका रात्रीत एक करोड देवी-देवीतांच्या मूर्त्या तयार केल्या तरंच त्याला केलाशात जाण्याची संधी मिळेल. तथापि, जेव्हा मूर्त्यांची संख्या मोजण्यात आली तेव्हा एक मूर्ती यात कमी आढळली. ही संख्या ९९ लाख ९९ हजार ९९ मूर्त्या अशी होती, यात एक करोडसाठी एका मूर्तीची कमी होती. यामुळेच या ठिकाणाला ‘उनाकोटी’ असे नाव मिळाल्याचे सांगितले जाते. खरंतर उनाकोटीचा अर्थच आहे, एक कोटींमध्ये एकाची कमतरता.