Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

31 डिसेंबर स्पेशल घरी बनवा मसालेदार अन् शाही चवीचे ‘शामी कबाब’, लगेच नोट करा रेसिपी

Shami Kabab Recipe : घरच्या घरी तयार केलेले हे स्वादिष्ट शामी कबाब पार्टीच्या मेजवानीत शाही रंग भरतील. याची रेसिपी फार सोपी आणि लज्जतदार आहे जी क्षणात कुणाचेही मन जिंकेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 25, 2025 | 03:47 PM
31 डिसेंबर स्पेशल घरी बनवा मसालेदार अन् शाही चवीचे 'शामी कबाब', लगेच नोट करा रेसिपी

31 डिसेंबर स्पेशल घरी बनवा मसालेदार अन् शाही चवीचे 'शामी कबाब', लगेच नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:
  • शामी कबाब हा दक्षिण आशियातील एक प्रसिद्ध पदार्थ आहे.
  • मुघल काळापासून कबाब भारतात आले आणि लोकप्रिय बनले.
  • 31 डिसेंबरच्या पार्टीची रंगत शाही पदार्थाने वाढवा, घरी बनवा लज्जतदार शामी कबाब.
शामी कबाब हा मुघलाई आणि अवधी खाद्यसंस्कृतीतील अतिशय लोकप्रिय आणि पारंपरिक पदार्थ आहे. विशेषतः रमजान, ईद, तसेच खास पाहुण्यांसाठी बनवला जाणारा हा कबाब चवीला जितका लाजवाब आहे, तितकाच तो पौष्टिकही आहे. मऊ, रसाळ आणि तोंडात टाकताच विरघळणारा शामी कबाब एकदा चाखल्यानंतर पुन्हा पुन्हा खावा असा वाटतो.

Christmas 2025 : सणानिमित्त घरी बनवा टेस्टी सर्वांच्या आवडीचा ‘रेड वेल्व्हेट केक’, रेसिपी नोट करा

पूर्वी शाही स्वयंपाकघरात बनवला जाणारा हा पदार्थ आज घराघरात आवडीने केला जातो. उकडलेले मांस, चणा डाळ आणि खास मसाल्यांचे मिश्रण यामुळे शामी कबाबला एक वेगळीच चव मिळते. बाहेरून हलका कुरकुरीत आणि आतून मऊ असलेला हा कबाब हिरवी चटणी, कांद्याचे काप आणि लिंबासोबत अप्रतिम लागतो. सण-समारंभ, पार्टी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी शामी कबाब हा एक परफेक्ट पर्याय आहे. चला तर मग, घरच्या घरी सोप्या पद्धतीने शामी कबाब कसा बनवायचा ते पाहूया.

साहित्य

  • 500 ग्रॅम बारीक चिरलेले मटण / चिकन
  • ½ कप चणा डाळ (भिजवलेली)
  • 1 मध्यम कांदा (चिरलेला)
  • 2-3 हिरव्या मिरच्या
  • 1 टेबलस्पून आले-लसूण पेस्ट
  • 1 टीस्पून लाल तिखट
  • 1 टीस्पून गरम मसाला
  • 1 टीस्पून धणे-जिरे पूड
  • ½ टीस्पून हळद
  • मीठ चवीनुसार
  • कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने (चिरलेली)
  • 1 अंडे (ऑप्शनल)
  • तेल तळण्यासाठी
ओव्हन- केक मोल्डमचा वापर न करता लहान वाट्यांमध्ये बनवा स्वादिष्ट कप केक, नोट करून घ्या इन्स्टंट रेसिपी

कृती

  • यासाठी सर्वप्रथम कुकरमध्ये मटण/चिकन, चणा डाळ, कांदा, आले-लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या, हळद आणि मीठ घालून थोडे पाणी टाका.
  • 3-4 शिट्ट्या देऊन मिश्रण नीट शिजवा. पाणी पूर्ण आटलेले असावे.
  • थंड झाल्यावर हे मिश्रण मिक्सरमध्ये वाटून मऊ पेस्ट तयार करा.
  • या पेस्टमध्ये लाल तिखट, गरम मसाला, धणे-जिरे पूड, कोथिंबीर-पुदिना आणि अंडे घालून नीट मळा.
  • हाताला तेल लावून लहान गोल किंवा चपटे कबाब तयार करा.
  • कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर कबाब सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळा.
  • गरमागरम शामी कबाब हिरवी चटणी, कांदे आणि लिंबासोबत सर्व्ह करा.
  • कबाब अधिक मऊ हवेत तर मिश्रण जास्त कोरडे होऊ देऊ नका.
  • कमी तेलात बनवायचे असतील तर तव्यावर शॅलो फ्राय करू शकता.

Web Title: 31st december special know how to make shami kabab at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2025 | 03:47 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
1

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
2

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Recipe : टी-टाईम स्नॅक्ससाठी आहे परफेक्ट, झटपट घरी बनवा टेस्टी चाॅकलेट बिस्कीट
3

Recipe : टी-टाईम स्नॅक्ससाठी आहे परफेक्ट, झटपट घरी बनवा टेस्टी चाॅकलेट बिस्कीट

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी
4

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.