Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केसांमधील उवा-लिखांसाठी 4 सोपे उपाय, मिळेल 100 टक्के त्वरीत सुटका

How to get rid of lice: शाळेतील मुलामुलींना केसांमध्ये उवा अथवा लिखा होणे हे खूपच कॉमन आहे. यामुळे केस खराब तर होतातच पण त्वचाही खराब होते. केसांमधून उवा झाल्यावर त्या काढणं अत्यंत कठीण काम आहे. मात्र काही घरगुती उपाय आहेत जे अतिशय फायदेशीर ठरू शकतात.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 05, 2024 | 10:09 AM
उवांसाठी घरगुती उपाय

उवांसाठी घरगुती उपाय

Follow Us
Close
Follow Us:

उवा ही एक सामान्य समस्या आहे, ज्यामुळे लहान मुलींना अधिक त्रास होतो. शाळेत केसांमध्ये उवा अथवा लिखा होणे हे अत्यंत कॉमन आहे. हे लहान कीटक केसांमध्ये राहतात आणि रक्त शोषतात, ज्यामुळे खाज सुटणे, कोंडा होणे अथवा . मात्र, यापासून सुटका मिळवण्यासाठी अनेक प्रकारचे शॅम्पू आणि औषधे बाजारात उपलब्ध आहेत. पण तुम्ही येथे सांगितलेल्या घरगुती उपायांनीही ते दूर करू शकता.

उवालिखांसाठी नक्की कोणते घरगुती उपाय आपण करू शकतो याबाबत आपण या लेखातून समजून घेऊ शकता. (फोटो सौजन्य – iStock) 

कडुलिंबाच्या तेलाचा वापर 

लिखा काढण्यासाठी कडुलिंबाचा रस

कडुलिंबाच्या तेलामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात जे उवा मारण्यास मदत करतात. कडुलिंबाचे तेल केसांच्या मुळांना नीट लावा, रात्रभर राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शॅम्पूने धुवा. आठवड्यातून दोनदा तुम्ही कडुलिंबाच्या तेलाचा वापर करा आणि उवालिखा काढून टाका. 

हेदेखील वाचा – पावसाळ्यामुळे होतंय केसांचं नुकसान? केसांची काळजी कशी घ्यायची सोप्या टिप्स

व्हिनेगरचा उपयोग

व्हिनेगरचा वापर करून काढा उवा-लिखा

व्हिनेगर डोक्यात उवा वाढण्यापासून रोखते. यासाठी एक कप पाण्यात एक कप व्हिनेगर मिसळा. नंतर हे मिश्रण केसांना लावा आणि काही मिनिटे तसेच राहू द्या. नंतर शॅंपूने केस धुवा. तुम्हाला जर एखाद्या पदार्थाची अलर्जी असेल तर याचा वापर करण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करून घ्या आणि मगच वापरा. 

लसणाचा रस लावा

केसांवर लावा लसणाचा रस

लसणामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे उवा मारण्यास मदत करतात. यासाठी लसूण बारीक करून त्याचा रस काढा. हा रस केसांच्या मुळापर्यंत लावा. 30 मिनिटे राहू द्या आणि नंतर केस शँपू लाऊन धुवा. प्रत्येक वेळी केस धुण्यापूर्वी हा लसणाचा रस लावा.

हेदेखील वाचा – केसांची निगा राखण्यासाठी वापरा सोप्या टिप्स, पावसाळ्यात पडतील उपयोगी

खोबरेल तेलात कापूर मिसळून लावा

कापूर आणि नारळाच्या तेलाचा करा वापर

नारळाच्या तेलात कापूर मिसळल्याने उवा मारण्यास मदत होते. यासाठी तुम्ही 7-8 कापूर बारीक करून तेलाच्या बाटलीत मिसळा, नंतर ते गरम करा आणि केसांच्या मुळापर्यंत लावा. रात्रभर राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी केस माईल्ड शँपूने धुवा. चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून दोनदा हे तेल वापरा.

या गोष्टींची घ्या काळजी 

हे उपाय करत असताना केस चांगले धुवावेत. समस्या गंभीर असल्यास किंवा हे उपाय करूनही उवा वा लिखा जात नसल्यास, आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा. उवा लिखा होऊ नयेत यासाठी आपले केस स्वच्छ ठेवा, केसांचा ब्रश आणि कंगवा स्वच्छ करा आणि इतर लोकांचा कंगवा, हेअरपिन्स किंवा टोपी वापरू नका. यासोबतच तुमच्या घरातील सर्व कपडे गरम पाण्याने धुवा.

टीप – उवा आणि लिखा मारण्यासाठी तुम्ही जे औषध वापरणार आहात त्याची आधी पॅच टेस्ट करून घ्या. त्यामुळे कोणतीही अलर्जी असल्यास त्रास होणार नाही. 

Web Title: 4 lice home remedy tips to get rid of instantly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2024 | 10:09 AM

Topics:  

  • hair care
  • home remedies
  • Skin Care

संबंधित बातम्या

उन्हाळ्यात घामामुळे केस चिकट आणि तेलकट होऊन जातात? ‘या’ पद्धतीने घ्या केसांची काळजी, केस राहतील स्वच्छ
1

उन्हाळ्यात घामामुळे केस चिकट आणि तेलकट होऊन जातात? ‘या’ पद्धतीने घ्या केसांची काळजी, केस राहतील स्वच्छ

Hair Care Tips: १० रुपयांमध्ये केस होतील चमकदार आणि काळेभोर! घरीच सोप्या पद्धतीमध्ये तयार करा नॅचरल रिठा शाम्पू
2

Hair Care Tips: १० रुपयांमध्ये केस होतील चमकदार आणि काळेभोर! घरीच सोप्या पद्धतीमध्ये तयार करा नॅचरल रिठा शाम्पू

केसांमध्ये वाढलेल्या कोंड्यामुळे खूप जास्त खाज येते? ‘या’ पद्धतीने करा तुरटीचा वापर, कोंडा होईल मुळांपासून नष्ट
3

केसांमध्ये वाढलेल्या कोंड्यामुळे खूप जास्त खाज येते? ‘या’ पद्धतीने करा तुरटीचा वापर, कोंडा होईल मुळांपासून नष्ट

केस गळून टक्कल पडण्याची भीती वाटते? केसांच्या वाढीसाठी ‘या’ पद्धतीने करा केळीच्या सालीचा वापर, केस होतील घनदाट
4

केस गळून टक्कल पडण्याची भीती वाटते? केसांच्या वाढीसाठी ‘या’ पद्धतीने करा केळीच्या सालीचा वापर, केस होतील घनदाट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.