अखेर पावसाळा ऋतू सुरु झाला आहे. उन्हाळ्याच्या तीव्र किरणांमुळे पावसाळा हवाहवासा तर वाटतो मात्र या ऋतूत आरोग्याच्या आणि केसांच्या समस्या उद्भवू लागतात. पावसाळ्यात आद्र्रतेचे परिमाण फार वाढते. तसेच अचानक पडलेल्या पावसाळामुळे आपले केस ओली झाली की अनेक केसांच्या समस्या उद्भवू लागतात. यामुळे केस निस्तेज आणि फ्रीझी होऊ लागतात. पावसाळ्यात केस फ्रीझी होणे ही एक सामान्य समस्या आहे. तसेच या दिवसांत स्कॅल्प (टाळू) तेलकट होणे आणि केसांची टोकं कोरडी पडणे अशा समस्याही उद्भवत असतात.
पावसाच्या पाण्यात प्रदूषक घटक असल्यामुळेही केस निस्तेज होण्याची शक्यता असते. मात्र केसांची नीट काळजी घटल्यास या सर्व समस्या दूर केल्या जाऊ शकतात. पावसाळयाच्या दिवसांत केस निरोगी आणि सुंदर राखावीत यासाठीच्या काही सोप्या टिप्स जाणून घेऊयात.
केस कोरडे राखणे आवश्यक
पावसात केस सतत ओले होत राहतात. मात्र केसांना पावसाळ्यात ृकोरडे ठेवणे कठीण आहे. केस चांगले राखायचे असतील तर बाहेर निघताना नेहमी रेनकोट, छत्री सोबत ठेवाव्यात. केस पावसाच्या पाण्याने ओले झाल्यास त्वरीत शॅम्पू व कंडिशनरने धुवून टाकावेत. यामुळे केसातील प्रदूषयुक्त पदार्थ बाहेर येण्यास मदत मिळते.
उत्पादने नेहमी चांगलीच वापरा
केस नियमितपणे धुवा. तुमच्या केसांसाठी योग्य असलेले चांगले शॅम्पू आणि कंडिशनर यांचा वापर करा. याशिवाय आठवड्यातून एकदा केसांची डीप कंडिशनिंग केल्याने केस मऊ होतील आणि योग्य पोषणही मिळेल.
केसांचे फ्रिजीपण लक्षपूर्वक पाहा
तुमचे केस फ्रिझी होत असतील तर त्यासाठी केसांना चांगल्या दर्जाचे हेअर सिरम वापरायला सुरुवात करा. केस ओलसर असतानाच त्यातील आर्द्रता लॉक करून ठेवण्यासाठी हेअर सिरमचा वापर करा. यामुळ केस मऊ होण्यास मदत मिळते. फ्रिजीनेस काढण्यास मदत मिळते.
निरोगी आहार आणि भरपूर पाणी प्या
केसांचे आरोग्य हे एकंदरीत तुमच्या आरोग्यावर आधारित असते. यासाठी संतुलित आहारावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या आहारात प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे यांचा समावेश असणे फार गरजेचे आहे. केस आणि टाळू आतून आर्द्र राखण्यासाठी भरपूर पाण्याचे सेवन करा. योग्य प्रमाणात पाणी पायल्याने केसांची लवचिकता आणि मजबुती कायम राखण्यास मदत मिळते.






