Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जगातील 5 असे किल्ले जिथे आजही शाही घराणे राहतात, जाणून घ्या तिथे कसं फिरता येऊ शकतं…

5 Famous And Historic Castle : जर तुम्हाला इतिहास, संस्कृती आणि राजेशाही वातावरणाचा अनुभव घ्यायचा असेल तर जगभरातील हे ऐतिहासिक किल्ले तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरु शकतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 19, 2026 | 08:48 AM
जगातील 5 असे किल्ले जिथे आजही शाही घराणे राहतात, जाणून घ्या तिथे कसं फिरता येऊ शकतं...

जगातील 5 असे किल्ले जिथे आजही शाही घराणे राहतात, जाणून घ्या तिथे कसं फिरता येऊ शकतं...

Follow Us
Close
Follow Us:
  • जगातील काही किल्ल्यांमध्ये आजही राजघराणे वास्तव्यास असून ते पर्यटकांसाठी खुले आहेत.
  • Windsor Castle आणि Balmoral Castle हे ब्रिटिश राजघराण्याशी संबंधित प्रसिद्ध किल्ले आहेत.
  • हे किल्ले इतिहास, शाही जीवनशैली आणि पर्यटन यांचा अनोखा अनुभव देतात.
किल्ले हे फक्त ऐतिहासिक वास्तू नाहीत तर इतिहास आहे जो आजही राजघराणे, परंपरा आणि त्यावेळच्या अनेक रहस्यांचे वास्तव डोळ्यासमोर आणतो. पूर्वीच्या काळात किल्ल्यांमध्ये राजघरणी इथे राहत होते पण काळासोबतच इथली वसाहत कमी झाली आणि ही वास्तू पर्यटनाचे ठिकाण बनले. पण तुम्हाला माहिती आहे का? आजही जगात असे काही किल्ले आहेत जिथे राजघराणे आजही आपल्या शाही थाटाने राहतात. यातील काही किल्ले आजही पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहेत ज्यामुळे ते जवळून तिथला इतिहास जाणून घेऊ शकतील. तुम्हालाही जर इतिहास आणि प्रवासाची आवड असेल, तर ही ठिकाणे तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरतील.

Travel Tips : 30 ओलांडायच्या आत फिरून या ही सुंदर ठिकाणे, लाईफटाइम लक्षात राहील अनुभव

विंडसर कॅसल, इंग्लंड

हा जगातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा रहिवासी किल्ला असल्याचे मानले जाते. किल्ला अंदाजे १३ एकर परिसरात पसरलेला असून इथे तुम्हाला शाही खोल्या आणि भव्य परिसर पाहायला मिळेल. इथे सेंट जॉर्ज चॅपल नावाचे एक प्रार्थनास्थळ आहे, जिथे शाही विवाहसोहळे आणि अंत्यसंस्कार पार पडतात. हा किल्ला वर्षभर पर्यटकांसाठी खुला असतो पण उन्हाळ्यात आणि विशेष शाही कार्यक्रमांच्या वेळी येथे गर्दी होण्याची शक्यता असते.

बाल्मोरल कॅसल, स्कॉटलंड

स्कॉटलंडमध्ये वसलेले बाल्मोरल कॅसल हे ब्रिटिश राजघराण्याचे खाजगी निवासस्थान आहे. साल १८५२ मध्ये राणी व्हिक्टोरियासाठी या किल्ल्याला खरेदी करण्यात आले होते. राणी एलिझाबेथ द्वितीय अनेकदा येथे उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्यासाठी येत होत्या. त्यांचे निधनही याच ठिकाणी झाले. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण स्कॉटिश रचनेसाठी आणि ५०,००० एकरच्या विस्तीर्ण परिसरासाठी ओळखला जाणारा हा किल्ला, त्याच्या खास स्कॉटिश वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी थोड्या कालावधीसाठी या ठिकाणाला खुले करण्यात येते. याकाळात पर्यटक येथील बागा आणि आतील परिसराला जवळून पाहू शकतात.

ग्लॅमिस किल्ला, स्कॉटलंड

हा किल्ला खास करुन त्याच्या आकर्षक कथांसाठी ओळखला जाते. हे तेच ठिकाण आहे जिथे राणी एलिझाबेथ यांचे बालपण गेले. याच ठिकाणी राजकुमारी मार्गारेट यांचाही जन्म झाला होता. हा किल्ला २० मार्च ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत लोकांसाठी खुला असतो. पर्यटक याकाळात तेथील भव्य खोल्या, सुंदर बागा, रेस्टॉरंट आणि भेटवस्तूंच्या दुकानाचा आनंद लुटु शकतात.

शॅटो डी चास्टेलु, फ्रान्स

शॅटो द शॅस्टेलक्स हा फ्रान्सच्या बरगंडी प्रदेशात असलेला एक अतिशय जुना आणि ऐतिहासिक किल्ला असल्याचे मानले जाते. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो जवळजवळ १,००० वर्षांपासून एकाच कुटुंबाच्या (शॅस्टेलक्स कुटुंबाच्या) मालकीचा आहे, जी फ्रान्समधील एक दुर्मिळ गोष्ट आहे. उन्हाळ्याच्या काळात या किल्ल्याला पर्यटकांसाठी खुले करण्यात येते. इथे ते जुने ग्रंथालय आणि उद्यान पाहू शकतात.

Water Of Tears : देशातील या तलावाला ‘अश्रूंचं तलाव’ का म्हटल जात? कुठे वसलं आहे ते जाणून घ्या

सावरसिन किल्ला, रोमानिया

सावरसिन किल्ला हे रोमानियातील अराड परगण्यात असलेला एक शाही ठिकाण आहे. याला “सावरसिनचा शाही भाग” म्हणूनही ओळखले जाते. किल्ल्याच्या आतील भागात पर्यटकांना जाण्यास मनाई आहे पण ते येथील बागा आणि संग्रहालय निवांतपणे पाहू शकतात.

Web Title: 5 castles in the world where royal families still reside know you can visit them travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 08:47 AM

Topics:  

  • History
  • places to visit
  • travel news

संबंधित बातम्या

Travel Tips : 30 ओलांडायच्या आत फिरून या ही सुंदर ठिकाणे, लाईफटाइम लक्षात राहील अनुभव
1

Travel Tips : 30 ओलांडायच्या आत फिरून या ही सुंदर ठिकाणे, लाईफटाइम लक्षात राहील अनुभव

Water Of Tears : देशातील या तलावाला ‘अश्रूंचं तलाव’ का म्हटल जात? कुठे वसलं आहे ते जाणून घ्या
2

Water Of Tears : देशातील या तलावाला ‘अश्रूंचं तलाव’ का म्हटल जात? कुठे वसलं आहे ते जाणून घ्या

Amarnath Yatra 2026 : या तारखेपासून सुरू होणार अमरनाथ यात्रा, जाणून घ्या घरबसल्या रजिस्ट्रेशनची प्रोसेस
3

Amarnath Yatra 2026 : या तारखेपासून सुरू होणार अमरनाथ यात्रा, जाणून घ्या घरबसल्या रजिस्ट्रेशनची प्रोसेस

एक अनोखे मंदिर जिथल्या दगडांमधून ऐकायला येत मधुर संगीत, विज्ञानालाही घातलंय याने कोड…
4

एक अनोखे मंदिर जिथल्या दगडांमधून ऐकायला येत मधुर संगीत, विज्ञानालाही घातलंय याने कोड…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.