Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Infertility Cause: लग्नानंतर गर्भधारणा होत नाही? 5 महत्त्वाची कारणं, करू नका दुर्लक्ष

Infertility Cause: लग्नानंतर हल्ली अनेक महिलांना गर्भधारणा न होण्याचा धोका निर्माण झाला आहे. याची नेमकी कारणं काय आहेत याबाबत तज्ज्ञांनी सांगितलं आहे. ५ महत्त्वाची कारणं जाणून घेऊया.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 02, 2026 | 05:26 PM
गर्भधारणा न होण्याची ५ महत्त्वाची कारणं कोणती (फोटो सौजन्य - iStock)

गर्भधारणा न होण्याची ५ महत्त्वाची कारणं कोणती (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • महिलांना गर्भधारणा न होण्याची वा वंध्यत्व येण्याची अनेक कारणं आहेत 
  • यापैकी ५ महत्त्वाची कारणं तज्ज्ञांनी सांगितली आहेत 
  • योग्य तपासणी आणि उपाय यासाठी आवश्यक आहेत
Infertility Cause: लग्न झाल्यानंतर काही वर्षानंतर प्रत्येक घरामध्ये लहान मूल असावं अशी घरातील वरिष्ठांपासून ते लहानांपर्यंत सर्वांची अपेक्षा असते. मूल जन्माला घालणं वा न घालणं हा सर्वस्वी जोडप्याचा प्रश्न आहे. पण काही जोडप्यांमध्ये बाळ हवं असूनही गर्भधारणा होत नाही. हल्ली अनेक जोडप्यांना यावर उपचार घ्यावे लागत आहेत. पण महिलांना गर्भधारणा का होत नाही याची नेमकी कारणं काय आहेत याबाबत महिला रोगतज्ज्ञ डॉक्टर शाहीन खान यांनी माहिती दिली आहे. 

PCOD, थायरॉईड, ओव्हरी सिस्ट, फायब्रॉईड, वाढते वजन आणि बिघडलेली जगण्याची पद्धती या सर्वात मुख्य समस्या असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. अशा परिस्थितीत योग्य डॉक्टरांचा सल्ला आणि त्यानुसार योग्य तपासणी आणि उपचार करण्याची गरज असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. 

Pregnancy Problem: लग्नानंतर 5 वर्ष मूल नाही, रिपोर्टही नॉर्मल; 1 टेस्ट आणि धक्कादायक बाब समोर

नेमकी कारणं केली स्पष्ट 

डॉक्टर शाहीन यांनी स्पष्ट केले की, लहान वयात फास्ट फूड आणि जंक फूडचे अतिसेवन आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. जंक फूड आणि तेलकट पदार्थ खाल्ल्यानेही आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. ज्या महिलांना अंडाशयाच्या समस्या, जसे की सिस्ट किंवा फायब्रॉइड्स, असतात त्यांना गर्भधारणा होण्यास अडचण येऊ शकते.

जर ओव्हरीमधील सिस्ट वाढू लागले तर हार्मोनल समस्या सुरू होऊ शकते आणि गर्भधारणेमध्ये अडचण निर्माण होते. महिलांना हार्मोनल समस्या, पीसीओडी वा थायरॉईडसारख्या समस्या झाल्यानंतर सर्वात आधी तपासणी करून घ्यायला हवी. याचा गर्भाशयावर काही परिणाम होतोय का याची लवकरात लवकर तपासणी करून त्यानुसार डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जेणेकरून त्वरीत उपाय सुरू करून गर्भधारणा करून घेण्यास मदत मिळू शकते. 

महिलांचे वाढ वयदेखील त्रासदायक 

डॉक्टरांनी स्पष्ट केले की, महिलांचे वय वाढल्याने त्यांच्यातील स्त्रीबीज निर्मिती आणि प्रजनन क्षमता बदलू शकते, ज्यामुळे गर्भधारणा होण्यास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे, महिलांनी त्यांच्या प्रजनन आरोग्याशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करू नये आणि गरज भासल्यास वेळेवर वैद्यकीय सल्ला घ्यावा. अतिरिक्त वजन आणि लठ्ठपणामुळे देखील हार्मोन्सचे असंतुलन होऊ शकते. महिलांच्या आरोग्यासाठी वजन नियंत्रणात ठेवणे आणि निरोगी जीवनशैली राखणे आवश्यक आहे.

World IVF Day: गर्भधारणेचा विचार करत आहात? पुरुष आणि महिलांच्या प्रजनन क्षमतेवर जीवनशैलीचा कसा होतो परिणाम

चाचणी आणि उपाय आवश्यक 

जर एखाद्या महिलेला गर्भधारणा होण्यास अडचण येत असेल, तर पहिली पायरी म्हणजे आवश्यक चाचण्या करून घेणे. चाचण्यांनंतर, समस्येचे मूळ कारण ओळखता येते आणि त्यानुसार उपचार करता येतात. याव्यतिरिक्त, आहार आणि जीवनशैलीकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. डॉक्टरांच्या मते, अनेक प्रकरणांमध्ये वेळेवर चाचण्या आणि उपचार केल्याने गर्भधारणेची शक्यता वाढू शकते. तुम्हालाही गर्भधारणा होण्यास त्रास होत असेल तर या पाच समस्या नाहीत ना याची सर्वात आधी तपासणी करून घ्यायला हवी हे लक्षात घ्या. 

Web Title: 5 causes for women infertility as per expert

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 05:26 PM

Topics:  

  • Health Tips
  • infertility
  • women health

संबंधित बातम्या

Kartiki Ekadashi: उपवासामुळे ॲसिडीटी अपचनाचा त्रास होतोय? तुमच्या आहारामध्ये या पदार्थांचा करा समावेश
1

Kartiki Ekadashi: उपवासामुळे ॲसिडीटी अपचनाचा त्रास होतोय? तुमच्या आहारामध्ये या पदार्थांचा करा समावेश

Lifestyle Tips: रोज नाभी, तळवे आणि डोळ्यांवर तूप लावावे का? जाणून घ्या फायदे आणि तोटे
2

Lifestyle Tips: रोज नाभी, तळवे आणि डोळ्यांवर तूप लावावे का? जाणून घ्या फायदे आणि तोटे

vegetable Tips: हिवाळ्यात ताज्या पालेभाज्या हव्यात? नोव्हेंबरमध्येच घरच्या घरी लावा या भाज्या
3

vegetable Tips: हिवाळ्यात ताज्या पालेभाज्या हव्यात? नोव्हेंबरमध्येच घरच्या घरी लावा या भाज्या

Blood Sugar Control: रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी सकाळी चालावे की रात्री, तज्ज्ञांचा खुलासा
4

Blood Sugar Control: रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी सकाळी चालावे की रात्री, तज्ज्ञांचा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.