Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Brain Health साठी विष ठरू शकतात 5 ड्रिंक्स, आजच व्हा दूर नाहीतर स्मरणशक्तीचा होईल ‘ऱ्हास’

मेंदू हा आपल्या संपूर्ण शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. आपले संपूर्ण शरीर त्याच्या नियंत्रणाखाली आहे. काही पेये आहेत ज्यांचे जास्त सेवन हळूहळू तुमच्या मेंदूला नुकसान पोहोचवून कमकुवत करू शकते

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 28, 2025 | 05:31 PM
स्मरणशक्तीची काळजी घेण्यासाठी वेळीच व्हा सावध (फोटो सौजन्य - iStock)

स्मरणशक्तीची काळजी घेण्यासाठी वेळीच व्हा सावध (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:

मेंदू हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग असून शरीरावर आणि अन्य गोष्टींवरही नियंत्रण ठेवतो. खरं तर, आपण जे काही खातो त्याचा आपल्या मेंदूवर थेट परिणाम होतो. चांगल्या आरोग्यासाठी योग्य आहार घेणे खूप महत्वाचे आहे असे नेहमीच तज्ज्ञ सांगतात. बऱ्याचदा, जाणूनबुजून किंवा नकळत, आपण आहारात अशा गोष्टींचा समावेश करतो जे मेंदूसाठी विषापेक्षा कमी नसतात. 

डॉ. प्रीती नागर, डाएटिशियन, एनआयआयएमएस मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल यांच्या मते, कॉफी, अल्कोहोलसारखी अनेक पेये मेंदूला पोकळ करतात. तुम्ही या सर्व पेयांपासून अंतर ठेवावे. त्यांनी अशा पेयांबद्दल माहिती दिली जी दुर्लक्षित करणे चांगले ठरते. कधीकधी अशी पेये चवीसाठी ठीक असतात परंतु याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुमच्या मेंदूला गंभीर नुकसान होऊ शकते. याबाबत या लेखातून आपण अधिक माहिती घेऊया, जाणून घेऊया कोणते आहेत हे ड्रिंक्स (फोटो सौजन्य – iStock) 

दारू अर्थात कोणत्याही प्रकारचे अल्कोहोल

दारूचा दुष्परिणाम

दारू आपल्या सर्वांच्या मेंदूवर विषासारखे काम करते. जर तुम्ही दारू कमी प्रमाणात जरी प्यायले तरीही यामुळे तुमचे नुकसानच होते. त्यामुळे विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता कमी होऊ शकते. जास्त दारू पिण्याने मेंदूच्या पेशी नष्ट होतात. त्यामुळे गंभीर मानसिक आजारदेखील होऊ शकतात. ते मेंदूसाठी तसेच लिव्हरसाठी हानिकारक आहे.

15 वर्ष मेंदूवर रिसर्च, तल्लख होण्यासाठी डॉक्टरने सांगितले काय खावे; मुलांचा मेंदू धावेल १०० च्या वेगाने

डाएट सोडा 

डाएट सोड्यामुळे होणारे नुकसान

डाएट सोडा तुम्ही जर नियमित पित असाल तर तुमच्या मेंदूसाठी याचा अधिक त्रास असू शकतो. यामुळे ब्रेन स्ट्रोक वा डिमेन्शिया आजाराचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे हेल्दी ड्रिंक्स अर्थात लिंबू पाणी वा नारळ पाणी पिण्याला तुम्ही प्राधान्य द्यावे आणि उन्हाळ्यातही डाएट सोडासारख्या पेयांपासून लांब रहावे

एनर्जी ड्रिंक्स 

एनर्जी ड्रिंक्सपासून रहा दूर

आजकाल बरेच लोक थकवा दूर करण्यासाठी एनर्जी ड्रिंक्स पितात. पण हेदेखील मेंदूसाठी हानिकारक आहेत. त्यात भरपूर कॅफिन आणि साखर असते, जी मेंदूला जास्त उत्तेजित करू शकते. यामुळे तुम्हाला अस्वस्थता आणि झोपेचा अभाव जाणवू शकतो. स्मरणशक्तीदेखील कमकुवत होऊ शकते.

‘या’ 5 फुड्सच्या सेवनाने तुमचा मेंदू होईल सुपरफास्ट, आजच करा आहारात समाविष्ट

खूप जास्त कॉफी

प्रमाणात करा कॉफीचे सेवन

कॉफीमध्ये कॅफिन असते जे थोड्या प्रमाणात लक्ष केंद्रित करते. बरेचदा झोप येत असेल तर ब्लॅक कॉफी वा कॉफीचे सेवन केले जाते. परंतु दिवसभरात जास्त कॉफी पिण्याने मेंदूला हानी पोहोचू शकते. जास्त कॅफिनमुळे झोप न लागणे, चिंताग्रस्त होणे आणि नैराश्य यासारख्या समस्या उद्भवू शकतात. दिवसातून एक किंवा दोन कप कॉफी पिणे पुरेसे मर्यादित ठेवणे चांगले ठरते. कॉफीचा अधिक हव्यास तुमच्या मेंदूला त्रासदायक ठरू शकतो. 

जास्त गोड ड्रिंक्स 

साखरेच्या गोड ड्रिंक्सपासून दूर रहा

सॉफ्ट ड्रिंक्स, पॅकेज्ड ज्यूस आणि गोड  मिल्कशेकमध्ये भरपूर साखर असते. जास्त साखरेमुळे मेंदूमध्ये सूज येऊ शकते. यामुळे विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता देखील बिघडते. याशिवाय अशा गोड ड्रिंक्समुळे डायबिटीससारख्या समस्यांनाही आमंत्रण मिळते. त्यामुळे तुम्ही अति गोड ड्रिंक्स पिणे टाळा. 

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: 5 drinks are slowly making brain health sick can lose memory health tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2025 | 05:31 PM

Topics:  

  • brain
  • Health Tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

How To Sharpen Knife: किचनच्या सुरीची धार कमी झालीये? ‘या’ उपायांनी काही मिनिटांत घरीच करा तीक्ष्ण
1

How To Sharpen Knife: किचनच्या सुरीची धार कमी झालीये? ‘या’ उपायांनी काही मिनिटांत घरीच करा तीक्ष्ण

डेंग्यूपासून लवकर रिकव्हरीसाठी खा हे सुपरफूड; डाएटमध्ये करा या पदार्थांचा समावेश
2

डेंग्यूपासून लवकर रिकव्हरीसाठी खा हे सुपरफूड; डाएटमध्ये करा या पदार्थांचा समावेश

आनंदी आणि तणावमुक्त जीवनाचं सीक्रेट; जपानी जीवनशैलीच्या ६ सवयी ठरतीय फायदेशीर
3

आनंदी आणि तणावमुक्त जीवनाचं सीक्रेट; जपानी जीवनशैलीच्या ६ सवयी ठरतीय फायदेशीर

Iodine Deficiency: आयोडीनच्या कमतरतेवर मात करायचीय? आहारात समाविष्ट करा ‘या’ ४ गोष्टी; थायरॉईडची समस्या राहील दूर
4

Iodine Deficiency: आयोडीनच्या कमतरतेवर मात करायचीय? आहारात समाविष्ट करा ‘या’ ४ गोष्टी; थायरॉईडची समस्या राहील दूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.