Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई परिसरातील आरोग्यसंपन्न उपक्रमामुळे वंचित वस्त्यांमधील बालकुपोषणात ८५ टक्‍के घट

२०२१ पासून हा उपक्रम प्रामुख्याने स्थलांतरित लोकसंख्या असलेल्या भागातील एक लाखांहून अधिक घरांपर्यंत पोहोचला आहे, जिथे लोकांचे उत्पन्न अनिश्चित आहे आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची उपलब्‍धता मर्यादित आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 08, 2026 | 10:30 AM
मुंबई परिसरातील आरोग्यसंपन्न उपक्रमामुळे वंचित वस्त्यांमधील बालकुपोषणात ८५ टक्‍के घट

मुंबई परिसरातील आरोग्यसंपन्न उपक्रमामुळे वंचित वस्त्यांमधील बालकुपोषणात ८५ टक्‍के घट

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: टाटा मोटर्स फाऊंडेशनच्या आरोग्यसंपन्न उपक्रमाने गंभीर आणि मध्यम बालकुपोषणात ८५ टक्‍के घट संपादित करत आर्थिक वर्ष २०२६ मध्ये मुंबई परिसरातील चेंबूर आणि वाशीनाका येथील १,००० हून अधिक मुलांच्या जीवनात सकारात्मक प्रभाव घडवून आणला आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील वंचित वस्त्यांमध्ये राबवण्यात आलेल्‍या या उपक्रमामधून शाश्वत समुदाय-आधारित पोषण आणि माता आरोग्य उपक्रमांद्वारे कुपोषणाशी लढता येते, हे निदर्शनास येते. हे यश जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आरोग्य समानता आणि प्रतिबंध या जागतिक उद्दिष्टांशी सुसंगत आहे.

सतत आंबट ढेकर येतात? जेवताना केलेली एक चूक शरीरासाठी ठरेल धोक्याची, अपचनाच्या समस्येवर करा ‘हे’ उपाय

निर्मया फाउंडेशनसोबत सहयोगाने विकसित केलेला टाटा मोटर्सचा आरोग्यसंपन्न उपक्रम महिला आणि बालकांच्या आरोग्याकरिता सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक प्रबळ करण्यासाठी, बालकुपोषणाची समस्या सोडवण्यासाठी, तसेच हा उपक्रम शाश्वत करण्याकरिता व्‍यक्तींच्‍या वर्तणुकीत बदल घडवून आणण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. २०२१ पासून हा उपक्रम प्रामुख्याने स्थलांतरित लोकसंख्या असलेल्या भागातील एक लाखांहून अधिक घरांपर्यंत पोहोचला आहे, जिथे लोकांचे उत्पन्न अनिश्चित आहे आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची उपलब्‍धता मर्यादित आहे.

चेंबूरसारख्या दाट लोकवस्तीच्या भागात नवजात बालक आणि तान्‍ह्या बाळांचे आरोग्य, तसेच गरोदर आणि नवीन मातांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. जागरूकता व पाठबळाच्या अभावामुळे तरुण माता अनेकदा अनियमित स्तनपान आणि नवजात बालकांना साखरेचे पाणी देण्यासारख्या असुरक्षित आहार पद्धतींचा अवलंब करतात. या वस्‍तुस्थितीमधून मातांची काळजी आणि पोषणविषयक जागरूकतेमधील गुंतागुंतीच्‍या त्रुटी दिसून येतात, ज्या या वंचित समुदायांमध्ये कुपोषणास कारणीभूत ठरत आहेत.

हा उपक्रम प्रतिबंधात्मक आणि समुदाय-केंद्रित दृष्टिकोनाचा अवलंब करतो, ज्यामध्ये बालकांचे पोषण, प्रसूतीपूर्व व प्रसूतीपश्चात काळजी यावर पालकांसाठी वैयक्तिक समुपदेशन आणि गट सत्रांचा समावेश आहे. हा प्रकल्प बालकांसाठी ओपीडीची व्‍यवस्‍था करतो समुदाय आरोग्य ग्रंथालये स्थापन करतो आणि सरकारी आरोग्य यंत्रणांशी सक्रियपणे समन्वय साधतो, ज्‍याद्वारे शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचे काम करतो.

बालआरोग्याच्या पलीकडे जात आरोग्यसंपन्न उपक्रम यावर्षी आरोग्य शिबिरे, पोषण आणि वर्तणूक बदलाच्या उपक्रमांच्‍या माध्‍यमातून जवळपास १०,००० समुदाय सदस्यांपर्यंत पोहोचला आहे. हा उपक्रम गरोदर महिलांना सरकारी आरोग्य व पोषण योजनांमध्ये नावनोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करतो आणि लसीकरण अपूर्ण असलेल्‍या बालकांना लसीकरणासाठी संदर्भित करतो.आपल्या पीअर ग्रुप डेव्हलपमेंट मॉडेलच्‍या माध्‍यमातून हा उपक्रम समुदायातील प्रमुखांना प्रशिक्षित करतो, ज्‍यामुळे जागरूकता वाढवून समाजात मालकीची भावना निर्माण होईल आणि समुदाय स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी स्वतः घेऊ शकतील.

या उपक्रमाबाबत मत व्‍यक्त करत टाटा मोटर्स फाऊंडेशनचे सीईओ विनोद कुलकर्णी म्‍हणाले, “शहरातील वस्‍त्‍यांमधील व्‍यक्तींना पोषण, आरोग्य सेवांची मर्यादित उपलब्धता आणि जागरूकतेचा अभाव यांसारख्या एकमेकांशी संबंधित असलेल्या आव्हानांचा सामना करावा लागतो. बालकुपोषणाची समस्या सोडवणे, समाजात जागरूकता निर्माण करणे आणि सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक उपलब्‍ध करून देणे या उद्देशाने आरोग्‍यसंपन्न उपक्रमाची संकल्‍पना मांडण्‍यात आली आहे. ट्रॉम्बे आणि वाशी येथे या उपक्रमाला मिळालेल्‍या यशामधून आमचा विश्वास अधिक दृढ झाला आहे की, आरोग्यविषयक उपक्रम स्थानिक समुदायावर आधारित, सातत्यपूर्ण आणि सरकारी यंत्रणांसोबत सहयोगाने राबवले जातात, तेव्हा व्‍यक्तींच्या वर्तणुकीत सकारात्मक बदल घडवणे शक्य असते.”

कोणत्याही गोळ्या औषधांचे सेवन न करता कोलेस्ट्रॉल होईल नष्ट! दैनंदिन जीवनातील ‘या’ सवयी शरीरासाठी ठरतील फायदेशीर

आरोग्यसंपन्नद्वारे मिळालेल्‍या निष्‍पत्तींमधून निदर्शनास येते की, अत्यंत गरजू शहरी समुदायांमध्ये बालकांचे पोषण आणि मातांचे आरोग्य सुधारण्यासाठी स्थानिक स्तरावरील उपक्रम प्रभावी ठरू शकतात. हा प्रकल्प तळागाळातील आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यासाठी अनुकरणीय आणि विस्तारण्यायोग्य मॉडेल सादर करतो.

Web Title: 85 percent reduction in child malnutrition in underprivileged communities due to health initiative in mumbai area

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • Child Health
  • Health Care Tips
  • Mumabi

संबंधित बातम्या

पोट स्वच्छ होऊन सुद्धा जडपणा जाणवतो? आतड्यांना सूज आल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे
1

पोट स्वच्छ होऊन सुद्धा जडपणा जाणवतो? आतड्यांना सूज आल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

उन्हाळ्यात सतत तहान लागते म्हणून फ्रिजचे पाणी पित असाल तर थांबा! जाणून घ्या थंड पाणी पिण्याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम
2

उन्हाळ्यात सतत तहान लागते म्हणून फ्रिजचे पाणी पित असाल तर थांबा! जाणून घ्या थंड पाणी पिण्याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम

अचानक हृदयाची धडधड वाढते? उच्च रक्तदाब वाढल्यानंतर शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
3

अचानक हृदयाची धडधड वाढते? उच्च रक्तदाब वाढल्यानंतर शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Heart Health: हृदय निरोगी ठेवायचंय? मग आहारात ‘या’ ६ सुपरफूड्सचा करा समावेश
4

Heart Health: हृदय निरोगी ठेवायचंय? मग आहारात ‘या’ ६ सुपरफूड्सचा करा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.