Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

High Cholesterol: औषधांचे सेवन न करता कमी होईल खराब कोलेस्ट्रॉल! जाणून घ्या दैनंदिन आहारात कोणते पदार्थ खावे

High cholesterol: शरीरात खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर हार्ट अटॅक किंवा हृदयाच्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे आहारात बदल, पोषक घटकांचे सेवन, शारीरिक हालचाल करणे फार आवश्यक आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 15, 2026 | 05:30 AM
High cholesterol: औषधांचे सेवन न करता कमी होईल खराब कोलेस्ट्रॉल! जाणून घ्या दैनंदिन आहारात कोणते पदार्थ खावे

High cholesterol: औषधांचे सेवन न करता कमी होईल खराब कोलेस्ट्रॉल! जाणून घ्या दैनंदिन आहारात कोणते पदार्थ खावे

Follow Us
Follow Us:

दैनंदिन आहारात कोणते पदार्थ खावे?
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काय खावे?
कोलेस्ट्रॉल वाढण्याची कारणे?

High cholesterol: धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, आहारात सतत होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, झोपेची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. आहारात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम शरीरावर होतो. त्यामुळे कायमच सहज पचन होणाऱ्या हेल्दी आणि टेस्टी पदार्थांचे सेवन करावे. हल्ली हार्ट अटॅकच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. हार्ट अटॅक आणि हृद्यासंबंधित आजार खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यामुळे दिसून येतात. खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये दिसून येणाऱ्या लक्षणांकडे कायमच दुर्लक्ष केले जाते. पण कालांतराने समस्या आणखीनच गंभीर होतात आणि शरीराला हानी पोहचवतात.

Protein Foods: प्रोटीन वाढवण्यासाठी सप्लिमेंट्सचे सेवन करत असाल तर थांबा! दैनंदिन आहारात करा ‘या’ शक्तिशाली पदार्थांचे सेवन

खराब कोलेस्ट्रॉल जमा झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये थकवा, अशक्तपणा वाढू लागतो. धमन्यांमध्ये पिवळ्या रंगाचा चिकट थर जमा झाल्यामुळे रक्तभिसरणात अडथळे निर्माण होतात. व्यवस्थित रक्तभिसरण न झाल्यामुळे हृदयाच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे दैनंदिन आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करणे फार आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला खराब कोलेस्ट्रॉपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर.

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात काय खावे?

दैनंदिन आहारात सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. ओट्स, जव, बीन्स, डाळी आणि छोले चणे, सफरचंद, संत्री आणि नाशपती इत्यादी फळांचा समावेश करावा. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात करण्यासाठी आहारात फायबर असलेल्या पदार्थांचा समावेश करावा. फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केल्यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होते आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. आहारात ऑलिव्ह ऑईल, मोहरीचे तेल किंवा शेंगदाणा तेलाचा कमीत कमी प्रमाणात समावेश करावा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा सॅल्मन, सार्डिन आणि मॅकरेल यांसारख्या माशांचा समावेश करावा. हे मशे शरीराला आवश्यक पोषण देतात.

शस्त्रक्रियेच्या जगात नवं पाऊल! वॉकहार्ट मुंबई सेंट्रलमध्ये दाखल झाली Da Vinci X रोबोटिक प्रणाली

सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट असलेले पदार्थ:

आहारात सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट असलेल्या पदार्थांचे कमीत कमी प्रमाणात सेवन करावे. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी केवळ गोळ्या औषधांचे सेवन नाहीतर स्वयंपाक घरात उपलब्ध असलेले पदार्थ खावेत. तेल-बटर, तूप, क्रीम, प्रक्रिया केलेले मांस, बेकरी पदार्थ आणि तळलेले फास्ट फूड कमीत कमी प्रमाणात खावे. सॅच्युरेटेड फॅट किंवा ट्रान्स फॅटचे प्रमाण वाढल्यानंतर अनसॅच्युरेटेड फॅट असलेल्या पदार्थांची निवड करावी. अ‍ॅव्होकॅडो आणि ऑलिव्ह हे पदार्थ शरीराला पोषण देतात. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी केवळ आहारात बदल करून चालणार नाहीत. नियमित व्यायाम, शारीरिक हालचाली, धूम्रपान करणे कमी करावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: खराब कोलेस्ट्रॉल म्हणजे काय?

    Ans: खराब कोलेस्ट्रॉल म्हणजे LDL (Low-Density Lipoprotein). याचे प्रमाण रक्तात वाढल्यास रक्तवाहिन्यांमध्ये चरबीयुक्त थर जमा होऊ शकतो. त्यामुळे हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.

  • Que: खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात कोणते पदार्थ खावेत?

    Ans: ओट्स, जवस, डाळी, कडधान्ये, फळे, भाज्या, सुका मेवा आणि संपूर्ण धान्यांचा आहारात समावेश करा. या पदार्थांमधील विद्राव्य फायबर आणि असंतृप्त चरबी कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतात.

  • Que: ओट्स खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते का?

    Ans: होय. ओट्समध्ये बीटा-ग्लुकन नावाचे विद्राव्य फायबर असते. नियमितपणे योग्य प्रमाणात ओट्स खाल्ल्याने LDL कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होऊ शकते.

Web Title: High cholesterol lower bad cholesterol without medication find out which foods to include in your daily diet sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Bad Cholesterol
  • Cholesterol home Remedy
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

Knee Pain: खाली बसताना किंवा उठताना गुडघ्यांमधून आवाज येतो? तरुण वयात गुडघ्यांमधील ग्रीस कमी होण्यास कारणीभूत ठरतात ‘या’ सवयी
1

Knee Pain: खाली बसताना किंवा उठताना गुडघ्यांमधून आवाज येतो? तरुण वयात गुडघ्यांमधील ग्रीस कमी होण्यास कारणीभूत ठरतात ‘या’ सवयी

जेवताना केलेल्या ‘या’ चुकांमुळे वाढतो किडनी स्टोनचा धोका, आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश केल्यास लघवीवाटे वाहून जाईल मुतखडा
2

जेवताना केलेल्या ‘या’ चुकांमुळे वाढतो किडनी स्टोनचा धोका, आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश केल्यास लघवीवाटे वाहून जाईल मुतखडा

World Arthritis Day: सांधेदुखीचा त्रास कशामुळे होतो? जाणून घ्या यामागील प्रमुख कारणे, लक्षणे आणि डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा
3

World Arthritis Day: सांधेदुखीचा त्रास कशामुळे होतो? जाणून घ्या यामागील प्रमुख कारणे, लक्षणे आणि डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा

Weight Loss: पोटावर वाढलेला चरबीचा घेर झपाट्याने कमी! भूक लागल्यानंतर ‘या’ पदार्थांचे आवर्जून करा सेवन, राहाल कायमच फीट
4

Weight Loss: पोटावर वाढलेला चरबीचा घेर झपाट्याने कमी! भूक लागल्यानंतर ‘या’ पदार्थांचे आवर्जून करा सेवन, राहाल कायमच फीट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.